Ajay Devgan on Pathaan: शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाबद्दल अजय देवगणचं मोठं विधान, म्हणाला “जे काही वाचलंय त्यानुसार….”


Ajay Devgan on Shahrukh Khan’s Pathaan: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) आपला आगामी ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटामुळे चर्चेत आहे. उद्या म्हणजेच 25 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. एकीकडे चित्रपटावरुन वाद सुरु असताना दुसरीकडे चित्रपटाने प्रदर्शित होण्याआधीच रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. यादरम्यान अजय देवगणने (Ajay Devgan) पठाण चित्रपटासंबंधी विधान केलं आहे. अजय देवगण त्याच्या आगामी ‘भोला’ (Bholaa) चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजदरम्यान बोलत होता. यावेळी त्याने प्रत्येत चित्रपट हिट झाला पाहिजे असं मत व्यक्त केलं. तसंच शाहरुखच्या पठाण चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगने रेकॉर्ड केल्याचा आनंद असल्याचंही म्हटलं आहे. 

अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ चित्रपटाने 280 कोटींची कमाई केली असून सुपरहिट ठरला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना अजयने सांगितलं की “दृश्यम 2 सुपरहिट झाल्यासंबंधी मला इतकंच सांगायचं आहे की, आपल्याला अशा तीन ते चार सुपरहिट चित्रपटांची गरज आहे. कारण करोनानंतर अनेक गोष्टींचा वेग कमी झाला होता. लोकांनी चित्रपटगृहात येऊन चित्रपट पाहण्याची सवय लावली पाहिजे”.

“प्रत्येक चित्रपट सुपरहिट व्हावा अशी माझी इच्छा आहे. आता पठाण प्रदर्शित होत असून अॅडव्हान्स बुकिंगबद्दल जे काही रिपोर्ट येत आहेत ते वाचून चांगलं वाटत आहे. मला मनापासून आनंद झाला आहे,” असं अजय देवगणने म्हटलं आहे. 

‘पठाण’ चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाला 40 ते 50 कोटींचं ओपनिंग मिळेल असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. 

दरम्यान ‘आरआरआर’ चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणाऱ्या यशावर अजय देवगणने आनंद व्यक्त केला आहे. या चित्रपटात अजय देवगणही मुख्य भूमिकेत आहे. राजामौली यांच्यामुळे आपल्या चित्रपटसृष्टीला नव्याने ओळख मिळाल्याचं अजय देवगणने म्हटलं आहे. “जेव्हा एखादा चित्रपट चालतो, तेव्हा संपूर्ण इंडस्ट्रीला फायदा होतो. त्याचप्रकारे राजामौली यांनी आपल्या चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं आहे,” असं कौतुक अजय देवगणने केलं आहे.

अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. अजय देवगणनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा दाक्षिणात्य चित्रपट ‘कैथी’चा रिमेक आहे. चित्रपटात तबूही मुख्य भूमिकेत आहे.Source link

Leave a Reply