Headlines

आजारपणादरम्यानच समंथाला मिळणार नागा चैतन्यची साथ!

[ad_1]

मुंबई : दाक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेता समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) हे वर्षी विभक्त झाले आहेत. गेल्या वर्षी त्या दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विभक्त झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. दरम्यान,  आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे की घटस्फोट घेतल्यानंतरही ते दोघे एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. 

समंथाचा यशोदा हा चित्रपट आज 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. समंथा सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सगळ्यात समंथा आणि नागा चैतन्य एका प्रोजेक्टसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, समंथा आणि नागा एका प्रोजेक्टसाठी एकत्र येण्याचा विचार करत आहेत. दोघेही प्रोफेशनल लेव्हलवर एकत्र काम करू शकतात. मात्र, अजुनही त्यांच्या या नव्या प्रोजेक्टविशयी कोणालाही माहित नाही. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत समंथानं तिला ‘मायोसिटिस’ नावाच्या आजाराचे निदान झाल्याची माहिती दिली होती. त्यावेळी नागा चैतन्यनं समंथासा तिच्या प्रकृतिची विचारपूसही केली होती.  नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनीही समंथाच्या आजाराची माहिती मिळताच समंथाला फोन करून तिच्या तब्येतीविषयी जाणून घेतलं होतं. दरम्यान, चाहत्यांना आशा आहे की हे दोघे भविष्यात काही प्रोजेक्टमध्ये एकत्र करतील. 

समंथा रुथ प्रभूने ‘कॉफी विथ करण 7’ मध्ये तिच्या वैवाहिक जीवनाविषयी अनेक खुलासे केले. अभिनेत्री म्हणाली होती की, जर नागा चैतन्य आणि तो एकाच खोलीत असतील तर Sharp वस्तू लांब ठेवाव्या लागतील. कारण ते अशा टप्प्यात आहेत जिथे ते एकत्र फिरू शकत नाहीत. (samantha ruth prabhu and naga chaitanya to work together in a project after separation) 

हेही वाचा : तब्बूला कशी मुलं आवडतात? अजय देवगणनं केला मोठा खुलासा

समंथा आणि नागा यांनी बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2017 मध्ये सप्तप्सी घेतल्या. पण 2021 मध्ये दोघांनी घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. आता दोघेही आयुष्यात पुढे गेले आहेत आणि आपापल्या कामावर लक्ष केंद्रित करत आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *