संपत्तीच्याबाबतीत ऐश्वर्या राय पती अभिषेकला टाकते मागे; जाणून व्हाल थक्क


Aishwarya Rai Abhishek Bachchan Net Worth : बच्चन कुटुंबियाची या सूनबाईने बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ऐश्वर्या राय हिचं बालपण हे मुंबईत गेलं. ती मुंबईतच नावारुपाला आली. ऐश्वर्या राय हिला पहिले मेडिकलचा अभ्यास करायचा होता मात्र तिने आर्किटेक्चरचा अभ्यास सुरु केला. मात्र पुढे मॉडेलिंगसाठी तिने तोही अभ्यास सोडला. आजही तिच्याकडे पाहून कोणी म्हणणार नाही की, ती 49 वर्षांची आहे ते…मीस वर्ल्ड ऐश्वर्या हिच्या संपत्तीवर आज आपण नजर टाकूयात… 

लोक ऐश्वर्या राय बच्चनच्या अभिनयाचेच नव्हे तर तिच्या सौंदर्याचेही वेडे आहेत. प्रत्येक चित्रपटात तिचं काम आवडतं. ऐश्वर्या राय एका वर्षात फार कमी चित्रपट करते, मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ती पती अभिषेक बच्चनपेक्षा जास्त कमाई करते. याशिवाय, ती करोडोंच्या मालमत्तेची मालक देखील आहे, जी अभिषेक बच्चनच्या एकूण संपत्तीपेक्षा कितीतरी जास्त आहे.

ऐश्वर्याची संपत्ती अभिषेकपेक्षा जास्त आहे
एका रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय बच्चनची एकूण संपत्ती $100 दशलक्ष आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार 817 कोटी रुपये होतात. त्याचबरोबर अभिषेक बच्चनची एकूण संपत्ती 203 कोटी रुपये आहे. ऐश्वर्या सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. एका चित्रपटासाठी ती 10 ते 12 कोटी रुपये मानधन घेते.

याशिवाय ऐश्वर्या अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना एंडोर्स करते ज्यामुळे ती भरपूर कमाई करते. रिपोर्टनुसार, ऐश्वर्या ब्रँड एंडोर्समेंटमधून वर्षाला सुमारे 80 ते 90 कोटी कमावते. एका दिवसाच्या शूटसाठी ती 6 ते 7 कोटी रुपये घेते.

अपार्टमेंटची किंमत करोडोंमध्ये आहे
याशिवाय ऐश्वर्या रायने एन्व्हायर्नमेंटल इंटेलिजन्स आणि हेल्थ केअर स्टार्टअपमध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक केली आहे. वांद्रे, मुंबई येथे 5 बेडरूमचं शानदार अपार्टमेंट आहे. ज्याची किंमत 30 कोटी रुपये आहे. एका रिपोर्टनुसार दुबईच्या सॅंक्च्युरी फॉल्समध्ये तिचा एक व्हिला आहे ज्याची किंमत सुमारे 15.6 कोटी रुपये आहे.

कलेक्शनमध्ये आहेत लग्जरी कार
ऐश्वर्या राय बच्चन लक्झरी कारची शौकीन आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये Rolls Royce Ghost (7.95 कोटी), Mercedes Benz S350d Coupe (1.60 कोटी) आणि Audi A8L 1.58 कोटींचा समावेश आहे. याशिवाय तिच्याकडे मर्सिडीज-बेंझ एस500 आणि लेक्सस एलएक्स 570 सारख्या गाड्या आहेत.Source link

Leave a Reply