शिष्यवृत्ती जमा करावी तसेच सर्व वसतिगृहे लवकर सुरू करण्याची एआयएसफची मागणी

कोल्हापूर – 2017-18 सालापासून जवळपास 1200 विध्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्तीपासून, शासनाच्या व शिवाजी विद्यापीठ शिष्यवृत्ती विभागाच्या गचाळ कारभारामुळे वंचित रहावे लागले होते. AISF कोल्हापूरच्या सततच्या पाठपुराव्यामुळे 3 वर्षांपासून त्रुटींच्या दुरुस्तीमुळे रखडलेले काम पूर्ण करून, सर्व अर्ज विद्यापीठाने समाजकल्याण विभागाकडे पाठविले आहेत परंतु, बजेट नसल्याने पुन्हा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागत असल्याने, लवकरात लवकर बजेट मंजूर करवून घेऊन, विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे तसेच शाळा, महाविद्यालये सुरू होऊन सुद्धा समाजकल्याण विभागाची वसतिगृहे आणखीन सुरू झालेली नसल्याने खेड्यापाड्यात राहणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

त्यातच बस सेवा बंद असल्याने, मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका त्यांना सोसावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ वसतिगृहे सुरू करून,विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी या मागण्यांसाठी AISF कोल्हापूरच्या वतीने सहाय्यक समाजकल्याण आयुक्त, कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी AISF चे राज्य सेक्रेटरी कॉ. प्रशांत आंबी, जिल्हा अध्यक्ष कॉ.हरिश कांबळे,जिल्हा सेक्रेटरी कॉ.धिरज कठारे,कॉ.आरती रेडेकर,कॉ.योगेश कसबे,कॉ.कृष्णा पानसे, कॉ.सुनिल कोळी उपस्थित होते.

Leave a Reply