एअरपोर्टवरच संतापला अभिषेक बच्चन; Viral Video मधून सत्य समोर


मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा कायमच त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि दिलखुलास व्यक्तीमत्त्वासाठी ओळखला जातो. अभिषेकनं आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत कमीजास्त प्रमाणात त्याच्याच व्यक्तीमत्त्वाचे काही पैलू पाहायला मिळाले. 

आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत यश आणि अपयशाची सर्व जबाबदारी घेत आणि खिल्ली उडवणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून त्यानं बॉलिवूडमध्ये स्वत:चं अस्तित्वं निर्माण केलं. 

आता म्हणे त्याचा एक व्हीडिओ समोर आला आहे जिथं अभिषेकचा पारा चढल्याचं दिसत आहे. 

आता ज्युनिअर बच्चनला नेमका राग का आला आणि त्याला राग दिला तरी कुणी, हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

या सर्व प्रश्नांची उत्तरं सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ देत आहे. 

या व्हिडीओमध्ये अभिषेक त्याच्या कारमधून उतरून विमानतळात प्रवेश करताना दिसत आहे. यादरम्यानच तिथे असणारे छायाचित्रकार त्याचा फोटो घेण्यासाठी म्हणून त्याला तिथेच अडवताना दिसतात. 

त्यांच्या या अशा वागण्यानं तापत्या उन्हात अभिषेकचाही पारा चढल्याचं स्पष्ट पाहायला मिळत आहे. काही क्षण थांबून त्यानं छायाचित्रकारांना बाहेर जाण्याचा इशारा दिला आणि त्यांच्यासाठी हा इशाराच पुरेसा होता.

सहसा अभिषेक असं काही करताना दिसत नाही. पण, यावेळी मात्र त्यानं आपल्या संतापानं सर्वांनाच थक्क केलं.  Source link

Leave a Reply