महाराष्ट्रातील सर्व निवडणुका एआयएमआयएम लढवणार – असदुद्दीन ओवेसी

औरंगाबाद: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमीन (एआयएमआयएम) महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढवेल आणि गरज पडल्यास इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करण्याचा पर्यायही खुला ठेवेल. ही माहिती एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी दिली. औरंगाबादच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या ओवेसी यांनी चीन आणि काश्मीरच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरही टीका केली आणि या प्रश्नांना सामोरे जाण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, असे सांगितले.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “चीन आमच्या जमिनीवर कब्जा करत आहे, पण सरकार हे मान्य करण्यास नकार देत आहे. जर आमची जमीन कोणीही ताब्यात घेतली नाही, तर भारत आणि चीनमध्ये आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या का झाल्या.? भारतीय जनता पक्षाने (भाजप) खासदारांच्या शिष्टमंडळास लडाखला घेऊन जाऊन वास्तव दाखवावे. मात्र भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या मुद्द्यावर मौन बाळगून आहेत.

Leave a Reply