डबल सेंच्युरीनंतर Ruturaj Gaikwad ने केलं असं कृत्य…सोशल मीडियावर एकच चर्चा


Ruturaj Gaikwad : विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या (Vijay Hazare Trophy 2022) दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाड नावाचं वादळ पाहायला मिळालं. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विरुद्धच्या रंगलेल्या सामन्यात महाराष्ट्राकडून (Uttar Pradesh vs Maharashtra) खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडने द्विशतक झळकावलंय. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात ऋतुराजने 220 रन्सची नाबाद खेळी केली. या सामन्यात महाराष्ट्राने 58 रन्सने सामना जिंकला. दरम्यान सामन्यानंतर ऋतुराजने त्याच्या कृत्याने सर्वांची मनंही जिंकली आहेत. 

द्विशतक ठोकल्यानंतर ऋतुराजला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरव करण्यात आला. मात्र यावेळी त्याने मनाचा मोठेपणा दाखवत एक कृत्य केलं. ऋतुराजच्या या कृत्याने सर्वजण त्याचं कौतुक करतायत.  

आज सोशल मीडियावरही Ruturaj Gaikwad ची सगळीकडे चर्चा होताना दिसतेय. विजय हजारे ट्रॉफीमध्ये 16 सिक्स आणि 10 फोरच्या मदतीने त्याने 220 रन्सची तुफान खेळी केली. यावेळी त्याला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं. मात्र त्याने स्वतःला नाही तर सामन्यात 5 विकेट्स घेणाऱ्या राजवर्धन हंगरगेकर या पुरस्काराचा खरा मानकरी असल्याचं म्हटलंय.

प्लेयर ऑफ द मॅच घोषित केल्यानंतर ऋतुराज गायकवाडने राजवर्धन हंगरगेकरला सर्वांसमोर बोलावलं. यावेळी त्याच्या उत्तम खेळीमुळे त्याला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देऊ केला. 

राजवर्धनने घेतले 5 विकेट्स

विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रथम फलंदाजी केल्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गोलंदाजीमध्येही चांगला खेळ केला. त्यांनी उत्तर प्रदेशाच्या गोलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली. राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) या सामन्यात सर्वात उत्तम गोलंदाजी करत 10 ओव्हरमध्ये 53 रन्स देऊन 5 प्रमुख विकेट्स घेतल्या. 

एका ओव्हरमध्ये ठोकले 7 सिक्सर

ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad World Record) एका ओव्हरमध्ये 7 सिक्स ठोकले आहेत. महाराष्ट्राच्या डावाच्या 49व्या ओव्हरमध्ये ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) ही किमया करून दाखवली आहे. ऋतुराजने बॉलर शिवा सिंहविरुद्ध ओव्हरच्या पहिल्या 4 बॉलमध्ये 4 सिक्स ठोकले. त्यानंतर पाचवा बॉल नो बॉल ठरला होता, त्या बॉलवर देखील त्याने सिक्स मारला होता. त्यानंतर पुढील दोन बॉलवर देखील त्याने सिक्स ठोकले आहेत.

आतापर्यंत एका ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकल्याची खेळाडूंची कामगिरी ऐकली असेल,पण प्रथमच एका खेळाडूने एका ओव्हरमध्ये 7 सिक्स ठोकले आहे. त्याची ही खेळी पाहुन क्रिकेट वर्तुळ अचंबित झाले आहे.Source link

Leave a Reply