घटस्फोटानंतर समंथाला ‘या’ गंभीर आजाराची लागण; परदेशात उपचार सुरू


Samantha Disease : दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे (Samantha Ruth Prabhu) चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरातदेखील आहेत. समंथाच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते आतुर असतात. समंथा आणि नागा चैतन्याच्या (Naga Chaitanya) घटस्फोटानंतर (Divorce) चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता. अशातच समंथाशी संबंधित एक वाईट बातमी समोर आली आहे. घटस्फोटाच्या वेदना सहन केल्यानंतर, अभिनेत्री आता एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. या आजारावर समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) परदेशात उपचार घेत आहे. (Samantha Ruth Prabhu Polymorphous Light Eruption)

माध्यमांच्या वृत्तानुसार, समंथा त्वचेशी संबंधित आजाराशी (skin diseases) झुंज देत आहे. या आजाराला ‘पॉलीमॉर्फ्स लाइट एरप्शन’ (Polymorphous Light Eruption) म्हणतात. हा आजार सूर्यप्रकाश थेट त्वचेवर पडल्यामुळे होतो. यामुळेच समंथा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाही.

सध्या डॉक्टरांच्या सल्ल्याने समंथाने कामातून ब्रेक घेतला आहे. ही बातमी समोर येताच तिचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. समांथाचे चाहते तिला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

सध्या समंथा ही पुढच्या ‘खुशी’ या चित्रपटाचे शूटिंग करत होती, पण आजारपणामुळे तिने चित्रपटाचे शूटिंग मध्येच थांबवले आणि उपचारासाठी थेट परदेशात रवाना झाली. या चित्रपटात सामंथासोबत विजय देवरकोंडा दिसणार आहे. समंथाच्या आजारपणामुळे या शूटिंगचे वेळापत्रक आता पुढे ढकलण्यात आलं आहे.

सद्गुरुंसोबत फोटो व्हायरल

ही बातमी समोर येण्यापूर्वी समंथा आणि सद्गुरुंमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या-वाईट गोष्टी (Good and bad things in life) घडत असतात. याबद्दल समंथाने सद्गुरूंना (sadhguru) एक प्रश्न विचारला. अभिनेत्रीच्या प्रश्नावर सद्गुरूंनी देखील मोलाचं उत्तर दिलं.

दरम्यान, 2021 मध्ये, समंथाने पती आणि अभिनेता नागा चैतन्यपासून वेगळं होण्याची घोषणा केली होती. दोघांनी 2017 मध्ये लग्न केलं आणि त्यानंतर 4 वर्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. समंथा आणि नागाच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.Source link

Leave a Reply