Headlines

अखेर Virat Kohli तो! अंपायरने OUT दिलंच नव्हतं तरीही…; किंग कोहलीच्या कृत्याची सगळीकडे चर्चा

[ad_1]

Virat Kohli : भारतीय टीमचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतोच. अशातच भारत विरूद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात देखील विराट त्याच्या एका कृतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहते त्याच्या कृतीचं कौतुक करतायत.

भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना शनिवारी रायपूरमध्ये खेळवला गेला. यावेळी फलंदाजी करताना रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला. या सामन्यात विराट कोहली मोठी खेळी करू शकला नाही, पण त्याच्या कृत्याने चाहत्यांची मनं मात्र जिंकली. 

Virat Kohli ची खिलाडूवृत्ती

विराट कोहली (Virat Kohli) टीम इंडियाचा असा एक खेळाडू आहे, जो मैदानावर नेहमी सतर्क असतो. याचीच प्रचिती कालच्या सामन्यात आली. कोहलीच्या या कृत्याला सर्वांनी फॉलो केलं पाहिजे. 

झालं असं की, विराट कोहली फलंदाजी करत होता. यावेळी न्यूझीलंडचा स्पिनर गोलंदाज सँटनरच्या ओव्हरमध्ये क्रीजमध्ये पुढे येऊन बॉलला डिफेंड करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र सँटनरच्या या बॉलला खूपच टर्न मिळाला आणि त्यामुळे विराट कोहली बिट झाला. अशातच विकेटकीपरनेही कोणतीही चूक न करता त्याला स्टंप केलं. आऊट होताच विराटने सरळ पव्हेलियनचा रस्ता धरला. 

मुख्य म्हणजे अशा परिस्थितीत गोलंदाजाच्या मागणीवर मैदानी अंपयार कीपरची अपील थर्ड अंपायरकडे पाठवतो. यावेळी रिप्लेमध्ये असं दिसून आलं की, विराट क्रीजपासून थोडा बाहेर आला होता. ज्यामुळे त्याला आऊटचा करार देण्यात आला. मात्र तोपर्यंत विराट ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला देखील होता. आऊट असताना अंपायरच्या निर्णयाची वाट न पाहिल्याने विराटच्या खिलाडूवृत्तीची सगळीकडे चर्चा होतेय. 

रोहित शर्माची कॅप्टन इनिंग

शनिवारी झालेल्या सामन्यात रोहित शर्माने तुफान फलंदाजी केली. यावेळी त्याने 50 बॉल्समध्ये रन्सची खेळी केली. यामध्ये कर्णधाराने 7 फोर आणि 2 सिक्सेसचा समावेश आहे. तर शुभमन गिलने 53 बॉल्समध्ये 40 रन्सची खेळी केली. रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर विराट कोहली देखील मैदानात उतरला होता. मात्र अवघ्या 11 रन्सवर त्याला माघारी परतावं लागलं.

टीम इंडियाने जिंकली सीरिज

न्यूझीलंडविरूद्धचा दुसरा वनडे टीम इंडियाने 8 विकेट्सने जिंकला. या सामन्यासह भारताने सीरिज देखील खिशात घातली आहे. या सामन्यात रोहित शर्माची बॅट अखेर तळपली. कर्णधाराने ओपनिंगला उतरत अर्धशतक झळकावलं आणि टीमला विजय मिळवून दिला. अवघ्या 21 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाने हे लक्ष्य गाठलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *