Headlines

30 वर्षांनंतर ग्रहांचा संगम! ‘पंच महापुरुष राज योग’ 4 राशींसाठी ‘लकी’

[ad_1]

Panch Mahapurush Yoga: ग्रहांच्या राशी बदलाचा सर्व लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. जेव्हा हे ग्रह एकत्र येतात, तेव्हा विशिष्ट योग तयार होतात. ग्रहांच्या या युतीचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. असाच ग्रहांचा योगायोग घडला आहे. 18 जूनला शुक्र वृषभ राशीत प्रवेश करताच पंच महापुरुष राज योग झाला आहे. हा राजयोग चार राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस येतील.

पंच महापुरुष राज योग 

बुध ग्रह आधीच वृषभ राशीत आहे. 18 जून रोजी शुक्र ग्रहानेही वृषभ राशीत प्रवेश केला. त्याच वेळी, शनि ग्रह 30 वर्षांनंतर त्याच्या स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीमध्ये उपस्थित आहे. यामुळे 4 राशींच्या संक्रमण कुंडलीत पंच महापुरुष योग तयार होत आहे.

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांच्या गोचर कुंडलीत दोन महापुरुष राजयोग तयार होत आहेत. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये चांगलं यश मिळेल. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना चांगली नोकरी मिळेल. तसेच एक मोठे पॅकेज मिळेल. पदोन्नती मिळण्याचीही शक्यता आहे. या काळात पद, पैसा आणि प्रतिष्ठा या तिन्ही गोष्टी मिळतील.

सिंह : सिंह राशीच्या गोचर कुंडलीत दोन राजयोग देखील तयार होत आहेत. या स्थितीमुळे कामात मोठे यश मिळेल. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. पैशाची आवक वाढेल. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे.

वृश्चिक : या राशीच्या लोकांच्या गोचर कुंडलीत दोन महापुरुष राजयोग तयार होत आहे. नवीन नोकरी, पदोन्नती, पगारवाढ यांचा योग तयार होत आहेत. या लोकांना नोकरी-व्यवसायात उत्तम यश मिळेल. एकूणच सर्वांगीण फायदा होईल.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांच्या गोचर कुंडलीत महापुरुष राज योग तयार होत आहे. हा राजयोग त्यांना भौतिक सुख आणि ऐश्वर्य देईल. या काळात भरपूर पैसे मिळतील,  तुम्ही घर-कार खरेदीसाठी खर्च करू शकता. या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *