Headlines

अफगाण सुफी प्रचारकाच्या हत्येतील संशयित मारेकऱ्यासह तिघांना अटक

[ad_1]

नगर : नाशिक जिल्ह्यातील येवला येथे अफगाणिस्तानातील मुस्लीम धर्मगुरूची हत्या करणाऱ्या संशयित मारेकऱ्यासह त्याचे दोन साथीदार अशा तिघांच्या राहुरी पोलिसांनी झडप घालून मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टय़ासह पाच जिवंत काडतुसेसी हस्तगत करण्यात आली आहेत.

संतोष हरिभाऊ ब्राह्मणे (२७, रा. समतानगर, कोपरगाव), गोपाल लिंबा बोरगुले (२६, रा. चवडी जळगाव, मालेगाव, नाशिक), विशाल सदानंद पिंगळे (२३, रा. कोपरगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील संतोष ब्राह्मणे हा अफगाणी सुफी प्रचारक, सुफी ख्वाजा सय्यद झरीफ चिस्ती (३८) यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मारेकरी आहे. सुफी प्रचारक झरीफ चिस्ती मूळचे अफगाणिस्तानातील परंतु येवला नाशिक येथे स्थायिक झाले होते. गेल्या ५ जुलैला येवला एमआयडीसीमध्ये त्यांची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. सूफी प्रचारक झरीफ चिस्ती हे झरीफ बाबा या नावानेही ओळखले जात. त्यांचे मोठय़ा संख्येने अनुयायी होते. या गुन्ह्याचा तपास नाशिक गुन्हे शाखा करत आहेत. गुन्हे शाखेने प्रसारित केलेल्या मारेकऱ्यांच्या छायाचित्रानुसार संतोष ब्राह्मणे हा संशयित मारेकरी असल्याची माहिती राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.

काल, बुधवारी सकाळपासून राहुरी पोलीस बेकायदा औषध साठय़ाच्या तपासात व्यस्त असतानाही तिघांच्या अटकेची कारवाई यशस्वी करण्यात आली. बारागाव नांदूर येथील औषध साठा जप्त करून जेवणासाठी राहुरी पोलीस घरी निघाले असता उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेटा यांना नगर-मनमाड राज्य महामार्गालगत असलेल्या ‘हॉटेल सर्जा’ येथे गावठी कट्टय़ासह सराईत गुन्हेगार जेवणासाठी बसल्याची माहिती मिळाली. उपनिरीक्षक नाऱ्हेटा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ती माहिती कळवली.  पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, निरीक्षक दराडे यांच्यासह पोलिस पथकाने रात्री १० च्या सुमारास हॉटेल सर्जा येथील गुन्हेगारांची झडती घेतली. संतोष ब्राम्हणे व विशाल पिंगळे यांच्याकडे दोन गावठी कट्टे आणि पाच जिवंत काडतुसे आढळली. हा थरार पाहून हॉटेलमधील ग्राहकांची तारांबळ उडाली.

राहुरी पोलिसांनी या तिघांना सध्या बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे, तसेच यासंदर्भात अफगाणी सुफी प्रचारकाच्या हत्येचा तपास करणाऱ्या नाशिक गुन्हे शाखेला ही माहिती कळवण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *