Headlines

अडल्ट, पॉर्न फिल्म्सना ‘ब्लू फिल्म’ का म्हणतात?

[ad_1]

मुंबई : चित्रपट सर्वजण पाहतात. प्रत्येकाला विविध धाटणीचे चित्रपट पाहण्याची आवड असते. मुळात वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे चित्रपट पाहण्याला अनेकांचीच पसंती असते. यासाठी थेट चित्रपटगृहांची वाट धरली जाते. कारण मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची मजा काही औरच. (why adult films called as blue films know the reason)

चित्रपट सुरु होण्यापूर्वी तुमच्यासमोर काही जाहिराती किंवा एक प्रमाणपत्र येतं. चित्रपटाचं नाव, त्याची नोंदणी, कोणत्या वयोगटासाठी चित्रपट साकारण्यात आला आहे याची माहिती त्या प्रमाणपत्रात देण्यात येते. 

इतकंच काय तर, य़ा चित्रपटाची श्रेणीही त्यामध्ये देण्यात येते. चित्रपटाच्या प्रमाणपत्रात अ किंवा यू लिहिलं असल्यास तो कोणीही आपल्या कुटुंबासमवेत पाहू शकतं. अल्पवयीनही असे चित्रपट पाहू शकतात. 

अश्लील चित्रपटांना कोणती श्रेणी? 
चित्रपटाला व किंवा ए श्रेणीतील प्रमाणपत्र दिलं गेल्यास त्यामध्ये अश्लील दृश्यांचा भरणा असल्यासोबतच अभद्र भाषेचाही वापर करण्यात आला आहे. असे चित्रपट अल्पवयीन गटातील कोणीही पाहू शकत नाही. 

ब्लू फिल्म म्हणजे नेमकं काय ? 
तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल की अडल्ट किंवा एखाद्या पॉर्न फिल्मचा उल्लेथ ब्लू फिल्म म्हणूनही करण्यात येतो. यामागचं कारण माहितीये? आतापर्तंयत तुम्ही कोणती बी अथवा सी ग्रेड चित्रपटाचं पोस्ट पाहिलं असल्यास ते निळ्या रंगात असेल. 

या तुलनेत सर्वसामान्य चित्रपटांच्या कॅसेट पांढऱ्या रंगात असतात. अडल्ट फिल्मच्या कॅसेट मात्र निळ्या रंगात असतात. म्हणूनच फार आधीपासून या चित्रपटांना ब्लू फिल्म म्हटलं गेलं. सध्या कॅसेट चालू नसल्या तरीही अशा चित्रपटांचा उल्लेख मात्र ब्लू फिल्म म्हणूनच केला जातो. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *