Headlines

आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचं प्रत्युत्तर! म्हणाले, “मोदींना वाटलं विभक्त…”; अमृता फडणवीसांचाही केला उल्लेख | Aditya Thackeray Marriage Issue Shivena leader slams ramdas kadam shinde group mention amruta fadnavis pm modi scsg 91

[ad_1]

एकनाथ शिंदे गटाचे समर्थक नेते रामदास कदम यांनी शिवसेनेच्या युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या लग्नाच्या मुद्द्यावरुन टीका केल्यानंतर शिवसेनेनं त्याला उत्तर दिलं आहे. ठाकरे गटाच्या समर्थक असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत निशाणा शाधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक गटाचा उल्लेख ‘मिंधे सेना’ असा केला आहे.

मुंबई तकशी बोलताना अंधारे यांनी ही टीका केली आहे. “महाराष्ट्र पिंजून काढत आहे. ‘वेदान्त’सारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याबद्दलचा संताप ते व्यक करत आहेत. पण त्यांच्याबद्दल पण विधान केली जात आहेत,” असं म्हणत अंधारे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अंधारे यांनी, “जो मैदानात असतो हुर्यो त्याच्या नावाचाच होतो. जे स्टेडियममध्ये बसलेल्या असतात त्यांची चर्चा कधीच होत नाही. समालोचक नेहमी मैदानात खेळणाऱ्या खेळाडूबद्दलच बोलत असतो. आदित्य ठाकरे मैदानात आहेत याचा आम्हाला अभिमान आहे,” असं म्हटलं.

यानंतर पत्रकाराने आदित्य ठाकरेंच्यासंदर्भातून, “त्यांच्या लग्नाबद्दल पण टीप्पणी झाली,” असं म्हणत अंधारे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर अंधारे यांनी, “त्यांच्या लग्नाची काळजी करायला त्यांचे आई-वडील समर्थ आहेत. त्याची काळजी मिंधे सेनेनं करण्याची गरज नाही. अमृताजी पक्षात नसता सुद्धा त्यांचं मॉडलिंगचं करियर सोडून इकडे येत आहेत त्याबद्दल आम्ही कधी चिंता व्यक्ती केली का? नाही केली. काय गरज आहे. त्यांचे यजनाम मुख्यमंत्री असताना त्यांच्यासाठी पोलिसांना वेठीस ठरुन शोची विक्री करायची मेहनत घेत होते ना? ते समर्थ आहेत ते करायला. त्यांचे यजमान बँकेला खाती उघडायला सांगत होते की नाही? ते समर्थ आहेत, त्यात कशाला पडायचं. ज्याच्या त्याचा प्रश्न ज्याला त्याला सोडवू द्यावा की नाही?” असा प्रतिप्रश्न केला.

पुढे बोलताना अंधारे यांनी पंतप्रधानांचाही उल्लेख केला. “हे बघा मोदींचं लग्न झालं. त्यांची काही अडचण होती. त्यांना वाटलं आपण विभक्त रहायचं आहे. हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. मोदीजींच्या निर्णयाचा आपण सन्मान केला पाहिजे. मोदीजींच्या या निर्णयामुळे त्यांच्या कामावर कसं काय प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं?” असा प्रश्न अंधारे यांनी विचारला. त्याचप्रमाणे त्यांनी, “आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा प्रश्न काढून तुम्हाला आदित्य ठाकरेंनी जे प्रश्न विचारलेत त्याची उत्तरं मिळणार आहेत का? असं करुन तुम्हाला वेदान्त फॉक्सकॉन परत आणता येणार आहे का? तुम्हाला इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येणार आहेत का? सध्या जे काही महिला असुरक्षित असल्याचं वातावरण आहे ते सोडवता येणार आहे का?” असे प्रश्नही विचारले.

“आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा मुद्दा केवळ बालीश चाळे आहेत,” असा टोला लगावता अंधारे यांनी बाळासाहेबांच्या विधानाचसंदर्भही दिला. “बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं झालं ना तर आदित्यच्या लग्नाची काळजी घ्यायला त्याचे मायबाप खंबीर आहेत. त्यासाठी रामदास कदमांनी उगाच आपलं वधूवर सूचक मंडळ घेऊन लुडबुड करु नये. आम्ही खंबीर आहोत त्यासाठी,” असं अंधारे यांनी म्हटलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *