aditya thackeray criticized shinde government on Versova Bandra sea Link job vacancy spb 94शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत वर्सोवा बांद्रा सी लिंक प्रकल्पावरून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात जे प्रकल्प राबवले जात आहेत, त्याच्या मुलाखतींची जाहिरात ही इतर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये दिली जात आहे, असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शांत का आहेत? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.

हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह घटनापीठासमोरील खटल्यांची ‘लाईव्ह’ सुनावणी होणार

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

“वर्सोवा बांद्रा सी लिंकचे काम अनेक दिवसांपासून बंद होते. आमच्या काळातही यासंदर्भात बैठका घेण्यात येत होत्या. हा पहिला उड्डाण पूल असणार आहे, ज्यावर चार टोल बसवण्यात येणार आहे. हे काम अनेक दिवसांपासून बंद असल्याने या कामाचे कंत्राटदार बदलण्यात आले आहे. मात्र, मी अनेक दिवसांपासून बोलतोय की आपल्या राज्यात प्रत्येक ठिकाणाहून नोकरीसाठी लोक येतात. कालपरवा माझ्या माहितीत एक धक्कादायक प्रकार आला आहे. वर्सोवा बांद्रा सी लिंकची कंपनी बदलल्यानंतर दुसऱ्या कंपनीकडे याचे काम देण्यात आले. या नवीन कंपनीने नोकरीसाठी जाहिरात काढली आहे. मात्र, याच्या मुखाखती चेन्नईत होत आहेत. हा प्रकल्प आपल्या राज्यात होणार आहे. मग आपल्या राज्यातल्या मुलांना नोकरीची संधी का दिली जात नाही. बाहेर राज्यात का मुलाखती घेतल्या जातात” , असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच इतका गंभीर प्रकार होत असताना राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष नेमके कुठे आहे, अशी टीकाही त्यांनी शिंदे सरकारवर केली आहे.

हेही वाचा – “…तर आम्ही उद्धव ठाकरेंचं स्वागत करू” महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत राहुल शेवाळेंचं मोठं विधान

शिंदे गटाला लगावला टोला

“गेल्या दोन आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी एमटीएचएलची पाहणी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच याचे ८० टक्के काम पूर्ण झाले होते. तसेच त्यांनी कोस्टल रोडची पाहणी केली. मला आनंद या गोष्टीचा आहे की जी कामं उद्धव ठाकरेंनी सुरू केली, ती काम आता ६० टक्क्यांच्यावर पूर्ण झाली आहेत. त्याची पाहणी आता सुरू आहे. त्यामुळे ४० गद्दारांना आमचं काम दिसत आहे”, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.Source link

Leave a Reply