Adipurush सिनेमाचा Teaser पाहून लोकांना का आठवतोय ‘तारक मेहता का उल्ट चष्मा’?


#DisappointingAdipurush : बहुचर्चित आदिपुरुष सिनेमाचा टिझर (Adipurush Movie Teaser) काल प्रदर्शित करण्यात आला. पण टिझर लाँच होताच कौतुकापेक्षा ट्रोल जास्त होऊ लागला आहे. सोशल मीडियावर (Social Media) मोठी स्टारकास्ट असेलला हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच ट्रोल होऊ लागला आहे. सुपरस्टार प्रभास (Prabhas), क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या ‘आदिपुरुष’ (Adipurush) या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर एकच टीकेची झोड उठली आहे.

सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) रावण अवताराचा लूक पाहून लोकांनी टीका सुरु केली आहे. तर चित्रपटात वापरण्यात आलेल्या VFXवरही लोकं नाराज आहेत. सोशल मीडियावर #DisappointingAdipurish हॅशटॅग (Hashtag) ट्रेंड (trend) होत आहे. अंकित सिंह नावाच्या एका युजरने RRR सिनेमाचा फोटो शेअर केला आहे. यात त्याने म्हटलंय, आदिपुरुषचा टिझर पाहून निराशा झाली. राजामौलीसारखे (S.S.Rajamouli) दिग्दर्शकच प्रभू श्री रामाचं योग्य चित्रण करु शकतात.

एका युजर्सने म्हटलंय, डिसने प्लस हॉटस्टारवरची मालिका ‘द लीजेंड ऑफ हनुमान’चं एनिमेशन यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं आहे. 

एका युजरने एन टी रामाराव यांच्या ‘भूकैलाश’ सिनेमाचा एक फोटो शेअर केला आहे. या सिनेमात तेलुगू सुपरस्टारने रावणाची भूमिका साकारली होती. या फोटोसोबत त्याने लिहिलंय, आदिपुरुष सिनेमा बनवण्याआधी ओम राऊत यांनी रामायणावर आधारीत काही तेलुगु सिनेमे पाहिला हवे होते, रावणच्या भूमिकेत सैफ अली कान गमतीशीर वाटत असल्याचंही त्याने म्हटलं आहे. 

एका युजरने तर आदिपुरुषवर टीका करताना थेट तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC) मालिकेची आठवण  काढली आहे. या मालिकेत रावणावर एक एपिसोड दाखवण्यात आला होता. युजरने म्हटलंय या मालिकेतला रावण आदिपुरुष मधल्या रावणापेक्षा कितीतरी पटीने चांगला होता.

काही युजर्सने तर आदिपुरुषची तुलना मोबाईल गेम्सशी (Mobile Games) केली आहे. एकाने आदिपुरुष म्हणजे टेम्पल रनचा (Temple Run) चौथा पार्ट असल्याचं म्हटलं आहे. रावणाला वटवाघुळसारख्या ड्रॅगनवर (Dragon) उडताना पाहून काही जणांनी त्याची तुलना ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’शी केली आहे. एका यूजरने रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ची आठवण करुन दिली आहे. या रामायणाची बरोबरी कोणी करू शकत नाही, असंही म्हटलंय. 

1993 मध्ये ‘रामायण: द लीजेंड ऑफ प्रिंस राम’ हा अॅनिमेटेड सिनेमा आला होता. भारत आणि जपानमधल्या फिल्ममेकरने मिळून हा सिनेमा बनवला होता. आदिपुरुषचा टिझर आल्यानंतर लोकं या चित्रपटाची आवर्जुन आठवण काढत आहेत. 19 वर्षांपूर्वी करण्यात आलेलं अॅनिमेशनची क्वालिटी आदिपुरुषशी कितीतरी पटीने चांगली होती. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा सिनेमा 12 जानेवारी 2023 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. Source link

Leave a Reply