Headlines

आधी अंबादास दानवेंचा गौप्यस्फोट, नंतर एकनाथ शिंदेंनी सांगितलं फोन कॉल करण्यामागचं नेमकं कारण; म्हणाले… | eknath shinde said did not asked ambadas danve to join shivsena mla rebel group

[ad_1]

शिंदे गटात सामील होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन कॉल केला होता, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे औरंगाबादमधील आमदार अंबादास दानवे यांनी केला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी दानवे यांच्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. शिंदे गटामध्ये येण्यासाठी त्यांना फोन केला नव्हता. अंबादास दानवे माझ्यासोबतच्या आमदारांच्या कुटुंबीयांना फोन कॉल करत होते, म्हणून मी त्यांना फोन केला, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले. ते मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >>> आरे मेट्रो कारशेड वाद : “…तर ही वेळच आली नसती,” आदित्य ठाकरेंच्या दाव्यानंतर देवेंद्र फडणवीसांची टीका

“मी त्यांना बंडखोरी करा असे सांगण्यासाठी फोन कॉल केला नव्हता. आमच्यासोबत असणाऱ्या आमदारांच्या घरी पत्नी, मुलांना ते फोन करत होते. आमदारांना सांगा मला (अंबादास दानवे) फोन करा असे ते सांगत होते. त्यामुळे तुम्हाला काही अधिकार दिले आहेत का? तुम्ही बॉस आहात का? हे विचारण्यासाठी मी त्यांना फोन कॉल केला होता,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार! गणेश मूर्तीसाठी उंचीची मर्यादा नाही, परवानग्यांसाठी एक खिडकी योजना

अंबादास दानवे यांनी सभेत काय सांगितले होते?

एकनाथ शिंदे यांनी मला शिंदे गटात सामील व्हा, अशी असे सांगण्यासाठी फोन केला होता, असे अंबादास दानवे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना सांगितले होते. “एखाद्या नेत्याचे कोणावर उपकार असतील तर ते फक्त शिवसेना पक्षाला समोर ठेवून होते. कोणी म्हणेल की, मी तुला खूप मदत केली. मला एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटात सामील होण्यासाठी फोन केला होता. मी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे, असं मी त्यांना सांगितले. त्यानंतर मी तुला निवडणुकीत मदत केली, असं ते म्हणाले. त्यानंतर उत्तरादाखल तुम्ही मला शिवसेना पक्ष म्हणून मदत केली. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं म्हणून तुम्ही मला मदत केली, असे मी त्यांना म्हणालो. काही आमदार शिवसैनिकांना सांगतील, मी तुझ्यासाठी हे केलं ते केलं. त्यांना एकच सांगा, की तुम्ही निवडून येण्यासाठी मी काम केलेलं आहे,” असे अंबादास दानवे सभेत बोलताना म्हणाले होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *