अभिनेत्रीच्या मृत्यूनं हादरलं कलाजगत; संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह


मुंबई :  ‘जनरल हॉस्पिटल’, ‘अमेरिकन हाउसवाइफ’ यांसारख्या कार्यक्रमांमध्ये काम करुन आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री लिंड्सी एरिन पर्लमॅन हिच्यासंदर्भातील अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

एकिकडे लिंड्सी तिच्या अभिनयामुळे प्रशंसा होत असतानाच दुसरीकडे तिच्या निधनाची बातमी हाती आली आहे. मागील काही दिवसांपासून लिंड्सी बेपत्ता असल्याचंही म्हटलं जात होतं. 

लिंड्सी बेपत्ता झाल्याचं कळताच स्थानिकांनी तिचा शोध घ्यावा असं आवाहन पोलीस यंत्रणेकडून करण्यात आलं होतं. 

43 वर्षीय लिंड्सी मागील आठवड्यात रविवारी बेपत्ता झाली. ज्यानंतर शुक्रवारी तिचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. 

लॉस एंजलिस येथील एका घरापाशी तिचा मृतदेह आढळलाय ज्याची माहिती नागरिकांनी लगेचच पोलिसांना दिली. दरम्यान, अद्यापही तिच्या बेपत्ता होण्याचं आणि निधनाचं मुख्य कारण समोर आलेलं नाही. 

लिंड्सीचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे…. ती या जगातून गेलीये… मी आता पूर्णपणे तुटलो आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती नंतरच देईन, पण तुमच्या आपुलकी आणि प्रेमाचा मी ऋणी आहे, अशी पोस्ट लिंजीच्या पतीनं, वॅन्स स्मिथनं लिहिली. 

'Chicago Justice' actress Lindsey Pearlman found dead at 43, after going missing since Feb 13

लिंड्सी ही मुळची शिकागोची. लॉस एंजलिसला येण्याआधी तिनं बराच काळ नाटकांमध्ये काम केलं होतं. कारकिर्द चांगलीच जोमात असताना लिंजीसोबत हे घडणं चाहते आणि कला जगताला हादरवणारं ठरत आहे. Source link

Leave a Reply