अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने खरेदी केली आलिशान कार, तिच्या किमतीत 8 गाड्या खरेदी कराल


मुंबई : Actress Shweta Tripathi bought a luxury car : मोठ्या पडद्यावरील आणि वेब प्लॅटफॉर्मची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने एक आलिशान कार खरेदी केली आहे. श्वेता त्रिपाठी (Shweta Tripathi) हिने खरेदी केलेल्या आलिशान कारचीच जोरदार चर्चा आहे. कार तिच्यासाठी स्वप्नापेक्षा कमी नाही. श्वेताने आपल्या मेहनतीच्या जोरावर आपले स्थान मिळवले आणि आज ती तिच्या ड्रीम कारची मालक बनली आहे.

या आलिशान कारचीच जोरदार चर्चा आहे. कारण कारची किंमत इतकी आहे की या कारच्या किमतीत तुम्ही 8 गाड्या खरेदी कराल. वर्क फ्रंटवर, श्वेताने 2009 मध्ये ‘क्या मस्त है लाइफ’ या टीव्ही शोमधून पदार्पण केले. आज ती इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे.

Shweta Tripathi

श्वेताने मर्सिडीज कार खरेदी केली आहे. त्याची किंमत जवळपास 80 लाख रुपये आहे. या कारचे मॉडेल मर्सिडीज ई क्लास 220 कार आहे. श्वेताच्या नव्या कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.

श्वेताने 2009 मध्ये ‘क्या मस्त है लाइफ’ या टीव्ही शोमधून पदार्पण केले. तेव्हापासून तिने मसान, हरामखोर, गॉन केस, मिर्झापूर, द गॉन गेम आणि ये काली-काली आँखे सारखे चांगले चित्रपट केले आहेत. तसेच तिने अनेक ‘टीव्ही शो’मधून काम केले आहेत.

तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे तर, ती ‘अ क्लीनिंग लेडी’ नावाच्या ‘सायकॉलॉजिकल थ्रिलर’वर काम करत आहे. याशिवाय त्याचे मिर्झापूर-३, ये काली-काली आंखे-२, गॉन गेम-२, एस्केप लाइव्ह, मकुचूस आणि एम फॉर माफिया हे शो आहेत. म्हणजे श्वेता वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेंटसह छोट्या पडद्यावर चमकत आहे.Source link

Leave a Reply