अभिनेत्री नव्हे, सौंदर्याची खाण; पाहताच अभिनेता विसरला घरचा पत्ता


मुंबई : काही अभिनेत्रींचं सौंदर्य हे आपल्याला निशब्द करुन जातं. तर काहींचं सौंदर्य थक्क. काहींना पाहून तर आपण भान हरपतो. असंच काहीसं एका अभिनेत्यासोबत झालं होतं. ज्यानं हिंदी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रीला पाहिलं आणि तिच्या सौंदर्यानं तो भारावला. 

ज्या अभिनेत्रीच्या अदा पाहून हा अभिनेता अवाक् झाला, ती अभिनेत्री म्हणजे परवीन बाबी. (Parveen babi)

पाश्चिमात्य आऊटफिट आणि फॅशन अगदी दिमाखात चित्रपटांमध्ये कॅरी करणाऱ्या परवीन बाबी यांच्या रुपाचे असंख्य चाहते. विश्वास बसायला वेळ लागेल, पण एक परदेशी अभिनेताही त्यांच्यावर भाळला होता. 

फक्त एक फोटो पाहून हा अभिनेता थेट ऑस्ट्रेलियातून भारतात आला होता. ज्यानंतर तो बराच काळ इथल्या चित्रपटांमध्येही झळकला. 

बॉब क्रिस्टो असं या अभिनेत्याचं नाव. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा या अभिनेत्याचा कोणताही मनसुबा नव्हता. पण, परवीन बाबी यांच्यासाठीच हा अभिनेता भारतात थांबला. 

परवीन यांची भेट घेण्यासाठी म्हणून तो ‘द बर्निंग ट्रेन’च्या सेटवर गेला होता. याआधी त्यानं परवीन यांना फक्त एका मासिकाच्या मुखपृष्ठावर पाहिलं होतं. 

चित्रपटाच्या सेटवर गेलं असता तिथे असणाऱ्या कॅमेरामशी हा अभिनेता बोलत होता. तितक्याच मागून एक आवाज आला आणि बॉब पलटला. 

Bob christo

तिथं परवीन बाबी होत्या, ज्यांचं रुप पाहून तो मायदेशी परतणंच विसरुन गेला. पुढे बॉबनं भारतीय चित्रपटांमध्येच काम करण्याचा निर्णय घेतला आणि हळुहळू त्यानं रुपेरी पडद्यासोबतच दिग्दर्शकांच्या मनातही आपली जागा मिळवली. 

80 के दशक की सुपरस्टार थी यह एक्ट्रेस, डिप्रेशन में बर्बाद हुआ था करियर | parveen  babi birthday special story, know these unknown facts about her

एका अभिनेत्रीच्या रुपानं भाळणं वगैरे ठीक, पण मायदेशीची वाटच विसरणं मात्र त्यावेळी पहिल्यांदाच घडलं असावं नाही का? 

तुम्हाला परवीन बाबी यांची भावलेली भूमिका कोणती? Source link

Leave a Reply