अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेला सेलिब्रिटी 51 व्या वर्षी होणार बाबा


Manoj Tiwari Second Wife Pregnant Again: भोजपुरी अभिनेते आणि भाजप नेते मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. लवकरचं बाबा होणार असल्याचं सांगत त्यांनी पत्नी सुरभी तिवारी यांच्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या मनोज तिवारी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Manoj Tiwari Surbhi Tiwari)

मनोज तिवारी यांनी व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘शब्दात भावना व्यक्त करु शकत नाही…’ असं लिहिलं आहे. मनोज तिवारी वयाच्या 51 व्या वर्षी बाबा होणार आहेत. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या व्हिडीओची चर्चा आहे. (Manoj Tiwari Family)

मनोज तिवारी यांचं सुरभी यांच्यासोबत दुसरं लग्न आहे. त्यांचं पहिलं लग्न 1999 साली झालं होतं. मनोज यांच्या पहिल्या पत्नीचं नाव राणी आहे. राणी आणि मनोज यांना मुलगी देखील आहे. ती तिच्या आईसोबत मुंबईत राहते. (Manoj Tiwari daughter)

पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर मनोज यांनी 2020 साली  लॉकडाऊन दरम्यान सुरभी तिवारी यांच्यासोबत लग्न केलं. महत्त्वाचं म्हणजे मोठी मुलगी  जियाच्या सांगण्यावरून त्यांनी लग्न केल्याचं सांगितलं जातं. 

भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या घरी आली नन्ही परी....

मनोज आणि सुरभी यांना एक मुलगी आहे. तिचं नाव सान्विका असं आहे. आता मनोज आणि सुरभी यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. (Manoj Tiwari Second Wife)

मनोज तिवारी यांचा राजकीय प्रवास

मनोज तिवारी यांनी 2013 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2014 च्या लोकसभेत निवडणुकीत उत्तर पूर्व दिल्लीतून पहिल्यांदा भाजपकडून तिकिट मिळवलं. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश अग्रवाल यांना हरवलं होतं. 

मनोज तिवारी यांचे सिनेमे 
मनोज तिवारी हे लोकप्रिय भोजपुरी अभिनेते आहेत. ‘ससुराल बडा पैसावाला’ या सिनेमातून त्यांनी कलाविश्वात पदार्पण केलं. त्यांचे ‘धरती काहे पुकार के’, ‘भोले शंकर’, ‘जनम जनम के साथ’, ‘ऐलान’, ‘अंधा’ असे अनेक सिनेमे गाजले आहेत. अभिनेता असण्यासोबतच राजकीय विश्वातदेखील ते तितकेच कार्यरत आहेत. Source link

Leave a Reply