Headlines

अभिनेता सारग कारंडे रुग्णालयात दाखल? स्वत:च्या तब्बेतीची बातमी ऐकून अभिनेत्याला धक्का

[ad_1]

मुंबई : झी मराठवरील लोकप्रिय कार्यक्रम ज्याने फक्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला ज्यांनी हसायला शिकवलं तो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या.’ या कार्यक्रमाने सगळ्यांना भरभरून हसायला शिकवलं. यामधील एक उत्तम अभिनेता म्हणजे सागर कारंडे. पुण्यातील शिक्षिका ते अगदी थेट ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्यापर्यंत पात्र साकारतो आणि ती यशस्वी करतो. जरी आता तो चला हवा येऊ द्या मध्ये दिसत नसला तरी या कार्यक्रमातून तो उंचीच्या शिखरावर पोहचला.

या सागर कारंडेचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे मिळालेली लोकप्रियता ही खरंच कौतुकाचा विषय आहे. सागर कारंडेचा स्ट्रगल हा खूप मोठा आहे.  नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारा सागर यावेळी मात्र एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

सागर कारंडेच्या तब्येतीबाबत गेली दोन दिवस अनेक अफवा समोर येत होत्या. कुणी म्हणत होतं त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे तर कुणी म्हणत होतं त्याला हृदय विकाराचा झटका आला आहे. तर काहींनी तो सीरियस असल्याचंही म्हंटलं होतं. यावर अखेर अभिनेता सागर कारंडे यानेच खुलासा केला आहे. सागरच्या तब्येती दोन दिवसांपूर्वी बिघाड झाला होता. यासंदर्भात त्याने आता खुलासा केला आहे.

सागरच्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाचा 20 नोव्हेंबर रोजी गिरगावातील साहित्य संघात प्रयोग करत करणार होता या नाटकाच्या प्रयोगाआधी सागरच्या छातीत दुखू लागलं. त्याच्या ही गोष्ट वेळेत लक्षात आल्यानं त्याला त्वरित डॉक्टरांकडे नेण्यात आलं. पण सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीबाबत चुकीची माहिती पसरवण्यात आल्यानं त्यानं खुलासा करण्यासाठी फेसबुक लाइव्ह करत सागरनं माहिती दिली आहे. आणि त्याच्या चाहत्यांना काळजी न करण्याचं आवाहान केलं आहे

सागरने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना सांगितलं की,  ‘गेल्या रविवारी 20 नोव्हेंबरला ‘हीच तर फॅमिलीची गंमत’ या आमच्या नाटकाचा प्रयोग संध्याकाळी 4 वाजता साहित्य संघला आयोजित करण्यात आला होता. तेव्हा अचानक माझ्या छातीत दुखू लागलं. मला चक्करही आली. दुपारी 12.30 ते1 च्या दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर मी रुग्णालयात गेलो. माझ्या सगळ्या टेस्ट करण्यात आल्या. माझे रिपोर्ट नॉर्मल आले. पण चेकअप झाल्यानंतर मला डॉक्टरांनी प्रयोग करण्यास किंवा प्रवास करण्यास मनाई केली होती. त्यामुळे हीच तर फॅमिलीची गंमत आहे या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला’.

‘छातीत दुखण्यामागचं कारण काय असू शकतं यासाठी माझ्या अनेक टेस्ट करण्यात आल्या. दिवसातून ईसीजी, डी इको करण्यात आली. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले. त्यानंतर डॉक्टरांनी गेल्या काही दिवसात माझ्या कामाबद्दल चौकशी केली.  गेला आठवडाभर मी प्रवास करत होतो

रात्री शूटींग, नाटकाचे प्रयोग, प्रवास, जेवण वेळेवर नव्हतं, त्यादिवशी मी काही खाल्लं नसल्याने अॅसिडीटी झाली. अॅसिडीटी वाढल्याने छातीत दुखत होतं, असं डॉक्टरांनी मला सांगितलं. दुसऱ्या दिवशी मला घरी देखील पाठवलं. मी तुमच्याशी बोलतोय याचा अर्थ मी बरा आहे. मला काहीही झालेले नाही. तेव्हा कुणीही चुकीची माहिती पसरवू नका असं आवाहन अभिनेत्याने या व्हिडिओच्या माध्यमातून केलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *