Headlines

बॉलिवूडमध्ये सक्रिय नसूनही Aishwarya Rai कोट्यवधी रुपयांची मालकिण

[ad_1]

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) आज अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली, तरी विश्नसुंदरी कायम चर्चेत असते. एवढंच नाही, तर तिच्या प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांची नजर असते. नुकताचं ऐश्वर्या कान्स फिल्म फेस्टिवलमुळे चर्चेत आली होती. बॉलिवूडपासून दूर असलेली ऐश्वर्या सध्या पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनसोबत आनंदाने आयुष्य जगताना दिसत आहे. फेस्टिवल मधील तिचा लुक प्रचंड चर्चेत होता. 

पण आता ऐश्वर्या तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नाही, तर तिच्याकडे असणाऱ्या संपत्तीमुळे चर्चेत आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्या फक्त अभिनेत्रीनसून ती एक बिजनेसवुमन देखील आहे. अभिनेत्रीने अनेक स्टार्टअप्समध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक केली आहे. 

एवढंच नाही तर, ऐश्वर्याने काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एका मोठ्या पवनऊर्जा प्रकल्पात पैसेही गुंतवले होते. दुसरीकडे अभिनेत्रीच्या सिनेमांबद्दल सांगायचं झांल तर, अभिनेत्री एका सिनेमासाठी 10-12 कोटी रुपये घेते. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या राय बच्चनची एकूण संपत्ती 775 कोटी रुपये आहे. अभिनेत्रीच्या एकूण संपत्तीमागे ब्रँड एंडोर्समेंटचाही मोठा वाटा आहे. ऐश्वर्या राय लॉरेल, लक्स, नक्षत्र डायमंड ज्वेलरी, टायटन, लोढा ग्रुप, कल्याण ज्वेलर्स यांसारख्या मोठ्या ब्रँडसाठी जाहिरात करते. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या केवळ ब्रँड एंडोर्समेंटमधून वर्षाला 80-90 कोटी रुपये कमावते. याशिवाय ऐश्वर्या रायने रिअल इस्टेटमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे. 

अभिनेत्रीचे मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 21 कोटी रुपयांचे अपार्टमेंट आहे. शिवाय अभिषेक आणि ऐश्वर्याने दुबईमध्ये प्रॉपर्टी घेतली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *