बलात्कार व घरफोडीच्या गुन्हयातील आरोपीस पोलिसांनी केले जेरबंद

माळशिरस –  १७ ऑक्टोंबर रोजी माळशिरस पोलीस ठाणे हद्दीतील तक्रारदार अभिजीत नाना गुजरे (रा. जगताप वस्ती ता. माळशिरस ) यांच्या घराचा कडी कोयंडा तोडुन घरातील कपाटात असलेले सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल अज्ञात आरोपीने घरफोडी करून चोरला होता.याप्रकरणी  माळशिरस पोलीस ठाण्यात  भादंवि क. ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

घरफोडींच्या गुन्हयांना आळा घालावा व गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी  पोलीस अधीक्षक श्रीमती. तेजस्वी सातपुते (भापोसे) यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सर्जेराव पाटील स्थानिक गुन्हे शाखा, यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.त्याप्रमाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्था. गु. शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक धंनजय पोरे व पोलीस उपनिरीक्षक अमितसिद पाटील यांचे पथकास आदेश दिले होते.

या  पथकाने या गुन्हयातील घटनास्थळास भेट देवून गुन्हयाचा संमातर तपास सुरू केला. या तपासात तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे वरील गुन्हा माळशिरस येथील आरोपीनी केल्याचे समजले. दि. १३ नोव्हेंबर रोजी या तपास पथकांनी नमुद आरोपींचा माळशिरस येथे शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. सदर आरोपीकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

आरोपीकडे अधिक तपास करता टेंभुर्णी पोलीस ठाणे गुरनं ४६३/२०२१ भादंवि क. ३६३, ३७६ सह बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण या गुन्हयात देखील सदर आरोपी हा पाहिजे होता . गुन्हा केल्यापासुन सदरचा आरोपी मिळुन येत नव्हता. तसेच माळशिरस पोलीस ठाणे गुरनं २२८/ २०२० भादंवि क. ३८०, ४५७ या गुन्हयात पाहिजे असलेला आरोपी असुन तो गुन्हा केल्यापासून मिळुन येत नव्हता. आरोपीस माळशिरस पोलीस ठाणे गुरनं ६११ / २०२१ भादंवि क. ३८०, ४५७ या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपीकडुन गुन्हयात चोरीस गेलेला मोबाईल १०,०००/-रू. किंमतीचा जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती. तेजस्वी सातपुते (भापोसे), मा. अपर पोलीस अधीक्षक ” श्री. हिम्मत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक धंनजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक, अमितसिद पाटील, सफौ. शिवाजी घोळवे, सफौ, मनोहर माने, पोलीस अंमलदार संदिप काशीद, प्रकाश कारटकर, सलीम बागवान, हरिदास पांढरे सचिन गायकवाड, सचिन मागाडे चापोना/ केशव पवार सर्व नेमणुक स्था. गु. शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी बजावली आहे.

Leave a Reply