पैश्याचा अपहार केले प्रकरणी अटक आरोपीची जामिनावर मुक्तता

बार्शी – सी.एस.एम. इन्फो सिस्टिम लिमिटेड नावाची खाजगी कंपनी असून ह्या कंपनी व्दारे ATM मशीन मध्ये पैसे भरले जातात यासाठी कँपनी मध्ये कस्टोडीअन म्हणून मुलांची भरती केली जाते.  या कंपनी मध्ये कस्टोडीअन  म्हणून उक्कडगाव ता.बार्शी येथील काम करणारा युवक अक्षय मुंढे याने दि.27/07/2021 ते 02/08/2021 पर्यंत रक्कम रुपये 5,04,600/- चा परस्पर अपहार केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात पोलिसांनी आरोपीस अटक करून वेळोवेळी पोलीस कोठडी घेतली होती.

दि.9/12/2021 रोजी न्यायालयीन कोठडी मिळताच आरोपीने अँड.रियाज शेख, बार्शी यांचे मार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.त्यावर शुक्रवार रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी धडके यांनी आरोपीचा50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन अर्ज मंजूर करत आरोपीची मुक्तता करण्याचे आदेश दिले तसेच कोणत्याही साक्षीदारावर दबाव न आणण्याचे  आदेश दिले आहेत.यात सरकार पक्षातर्फे श्री अँड.एस.आर.जोशी आरोपी तर्फे श्री अँड.रियाज शेख यांनी काम पाहिले.

Leave a Reply