Headlines

अभिषेक बच्चनसोबत लग्न करण्याआधीच ऐश्वर्या राय आहे विवाहीत?

[ad_1]

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांना कोण ओळखत नाही. दोघंही खऱ्या आयुष्यात पती-पत्नी असून त्यांना एक गोड मूलगी आहे. त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं झालं तर ते दोघं ‘गुरु’ चित्रपटाच्या सेटवर एकमेकांना भेटले, त्यानंतरच एकमेकांशी बोलणं सुरू झालं आणि हळूहळू त्यांच्यात प्रेमाचं नातं निर्माण होऊ लागलं.  दोघांनी खूप दिवस एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर 2007 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याने लग्न केलं.

त्यांना आराध्या बच्चन नावाची मुलगी आहे. ऐश्वर्या आपल्या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. बच्चन कुटुंब नेहमीच चर्चेत असतं. कधी तिच्या अभिनयाने तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. आणि आज गोष्ट आहे ऐश्वर्या राय बच्चनची. ज्यामध्ये ऐश्वर्याचं लग्न झालं आहे असं बोललं जात आहे. जेव्हा या दोघांच्या लग्नाची बातमी समोर आली होती. तेव्हा अनेक अफवा उठल्या होत्या, आता ही अफवा आहे की, सत्य आहे याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्न मुंबईत अमिताभ बच्चन यांच्या घरी झालं होतं. ज्यामध्ये ठराविक लोकांनाच आमंत्रित करण्यात आलं होतं. दोघांचंही लग्न गुप्त ठेवण्यात आलं होतं आणि काही वेळाने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. यासोबतच ऐश्वर्याबाबत अशा अनेक अफवाही पसरल्या आहेत. ज्यामध्ये असंही म्हटलं गेलं आहे की, ऐश्वर्याचं आधीच दुसऱ्याशी लग्न झालं आहे. 

ऐश्वर्या मांगलिक आहे आणि हा मांगलिक दोष दूर करण्यासाठी ऐश्वर्याने अभिषेकशी लग्न करण्यापूर्वी कुंभ विवाह केला आहे. यावेळी अभिनेत्रीने पिंपळाच्या झाडाशी लग्न केलं होतं. या सर्व अफवांच्या संदर्भात ऐश्वर्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, या निरुपयोगी गोष्टींमुळे मला सर्वांसमोर मान खाली करावी लागते. या अफवा माझ्या पेचाचं कारण बनल्या आहेत.

रोपसोबत लग्नाबाबत ऐश्वर्या राय बच्चन म्हणाली की, मी पिंपळाच्या रोपट्याशी लग्न केलं होतं हे खरं आहे. पण मला या अफवा पसरवणं आवडत नाही. आमच्या घराचे सर्व निर्णय घरच्या प्रमुखावर म्हणजेच पापा यांच्यावर सोडले जातात आणि ते सर्वांना उत्तर देतात. त्यामुळे आमच्या लग्नानंतर त्यांनी स्वतः मीडियासमोर येऊन मीडियाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्वजण ही अफवा पसरवाल, हे योग्य नाही.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *