Headlines

“अबे… आपल्या एवढा श्रीमंत तर अंबानी पण नाय आपल्या घरात पैशाची…”; जाहीर भाषणात अमोल मिटकरींचं वक्तव्य | Amol Mitkari Says I have 2 bags of coins at my home i am richer than ambani scsg 91

[ad_1]

आपल्या वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या घरामध्ये एक रुपयाच्या नाण्यांनी भरलेली दोन पोती असल्याचा खुलासा केलाय. ही पोती त्यांच्या घरामध्ये का आहेत यामागील कारणाचाही त्यांनी खुलासा केला. मात्र त्याचबरोबर ते या पोत्यांच्या जीवावर अनेकांना आपण अंबानींपेक्षाही श्रीमंत असल्याचं सांगत फिरतात असंही उहासात्मक भाष्य करताना मिटकरींनी म्हटलंय.

नक्की वाचा >> २० कोटी रोख, सोन्याच्या विटा, दागिने अन्…; बंगालमध्ये त्याच महिलेच्या दुसऱ्या घरात ईडीला सापडलं २९ कोटींचं घबाड

संभाजीनगरमधील पँथर्स रिपब्लिकन पार्टीने आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर ठराव दिनानिमित्त बुधवारी मिटकरी यांनी भाषण दिलं. गंगाधरराव गाडे यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक दिनी उपस्थितांसमोर विचार व्यक्त केले असं सांगताना या कार्यक्रमातील काही फोटोही मिटकरी यांनी ट्विटरवरुन शेअर केले आहेत. या कार्यक्रमामध्ये बोलताना मिटकरींनी आपल्या घरात दोन पोती भरुन एक रुपयाची नाणी असून या नाण्यांचे एकूण मूल्य २६ हजार रुपये इतकं असल्याची माहिती दिली.

आपल्या भाषणामध्ये मिटकरी यांनी त्यांचे जुने सहकारी राजाभाऊ शिरसाट यांच्याबद्दल भाष्य केलं. “राजाभाऊंनी माझी नाणेतुला केली तेव्हा त्यांनाही वाटलं नसेल की हा आमदार होईल. नाणेतुला म्हणजे एक रुपयांच्या नाण्यांनी केलेली तुला. त्यांना वाटलं ४०-५० किलो लागतील. ते भरले ८२ किलो. घरी गेल्यावर मोजले मी राजाभाऊ. मी आणि बायको दोन तीन दिवस मोजत बसलो. १००-१०० नाण्यांचे वाटे करुन पैसे मोजले. ती सर्व नाणी मोजली तेव्हा ते निघाले २६ हजार रुपये,” असं मिटकरींनी आपल्या भाषणात सांगितलं.

नक्की वाचा >> राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; म्हणाले, “शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन…”

“राजाभाऊ सिरसाट नावाचा माणूस असा आहे की ज्यावेळेस माझी खाण्याचीही परिस्थिती नव्हती त्यावेळेस त्याने माझी नाणेतुला केली २६ हजारांनी. पण मी त्यातील एकही नाणं खर्च केलेलं नाही. असून जसंच्या तसं ठेवलेलं आहे. कधीही या आणि बघा. ती नाणी मी दोन कट्ट्यांमध्ये भरुन ठेवली आहेत. मी लोकांना सांगत असतो, ‘अबे आपल्या एवढा श्रीमंत तर अंबानी पण नाय आपल्या घरात पैशाची पोती आहेत.’ राजाभाऊ हे तुमच्यामुळे,” असं आपल्या भाषणात मिटकरींनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.

नक्की वाचा >> “उद्धव ठाकरेंना संजय राऊतांच्या तावडीतून मुक्ती मिळू दे”; शिंदे गटातील आमदाराकडून वाढदिवसाच्या खोचक शुभेच्छा

मिटकरी यांनी पुढे, “खरोखरच अंबानी आपल्यासारखा श्रीमंत नाही. आपल्या घरात संविधान आहे. त्यांच्या घरात संविधान नाहीय. त्यांनी कितीही घरं बांधू द्या,” असंही म्हटलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *