Headlines

आता शिंदे गट आणि राज ठाकरेंच्या मनसेमध्ये संघर्ष होण्याची शक्यता; मनसेनं शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतरही नवी मुंबईत… | 65 MNS Workers and local leaders from Navi Mumbai quits Raj Thackeray Party to Support Eknath Shinde Group scsg 91



राज्यामधील अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर शिवसेनेमधील अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटामध्ये प्रवेश केला आहे. आतापर्यंत शिवसेनेला धक्का देणाऱ्या शिंदे गटाने आता थेट राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पाडलं आहे. नवी मुंबईतील पनवेल, उरण आणि खारघरमधील मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केलाय. यामध्ये प्रामुख्याने नवी मुंबईचे मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांचा समावेश आहे.

नक्की पाहा >> Photos: दोन मंत्र्यांच्या ‘शिंदे सरकार’ची नकोश्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल; CM म्हणून शिंदेच्या नावे होणार ‘हा’ नकोसा विक्रम?

नवी मुंबईमध्ये मागील आठ वर्षांपासून जिल्हाध्यक्ष पदावर असणाऱ्या अतुल भगत यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसहीत एकनाथ शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. भगत यांच्यासोबतच मनसेच्या आजी-माजी ६५ हून अधिक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. या प्रवेशाबरोबरच नवी मुंबईमध्ये मनसेत असणारी अंतर्गत धुसफूस समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भगत यांच्यासोबत नवी मुंबईचे उप-तालुकाध्यक्ष आणि इतर पदाधिकारीही शिंदे गटामध्ये सहभागी झाले आहेत.

नक्की वाचा >> “…कारण पुढचा नंबर उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा असू शकतो”; संजय राऊतांचा उल्लेख करत निलेश राणेंनी केलेलं ‘ते’ ट्विट चर्चेत

एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या सर्वांनी शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदेंनी भगत यांच्या हातात भगवा झेंडा देत त्यांचं आपल्या गटात स्वागत केलं. तर या सर्व पदाधिकाऱ्यांनी गणपतीची मूर्ती मुख्यमंत्री शिंदे यांना भेट दिली. मनसेने शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिल्यानंतरही पदाधिकारी शिंदे गटात सामील होत असल्याने पक्षांतर्गत वादातून हा निर्णय घेतला असल्याची चर्चा नवी मुंबईत आहे. आता मनसे पदाधिकाऱ्यांच्या या प्रवेशावरून शिंदे गट आणि मनसेमध्ये वाद होण्याची शक्यताही स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली आहे.

नक्की वाचा >> “सरसंघचालकांनी आम्हाला एवढंच सांगितलं की…”; मोहन भागवतांच्या भेटीनंतर हिंदुत्वाचा उल्लेख करत फडणवीसांची प्रतिक्रिया

राज्यात सत्तांतर घडवून आणणाऱ्या बंडाळीचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला धक्के बसू लागले आहेत. ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या ६७ पैकी ६६ , तर नवी मुंबई पालिकेतील ३८ पैकी २८ माजी नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. नवी मुंबई पालिकेतील शिवसेनेच्या ३८ पैकी २८ माजी नगरसेवकांनी महिन्याभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन येथील निवासस्थानी भेट घेत शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केलेला.



Source link

Leave a Reply