‘आता मी रात्री रोज’ अर्जून कपूरचं मलायकाबाबत मोठं वक्तव्य


मुंबई :  अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे त्यांच्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत असतात. अर्जुन कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. मलायका अरोरासोबतचं नाते त्याने कधीही कोणापासून लपवलेलं नाही. मलायका घटस्फोटित असून तिला एक मुलगा आहे. मलायका आणि अर्जुन जवळपास चार वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. त्याआधी मलायका अरबाज खानची पत्नी होती पण दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर मलाइकाला मुलगा अरहानची कस्टडी मिळाली आहे.

 गेली अनेक वर्ष ते एकमेकांना डेट करत आहेत. आता मलायकाबरोबर रिलेशनमध्ये आल्यावर अर्जुनच्या आयुष्यात काय बदल झाला आहे हे त्याने सांगितलं. त्यांच्या नात्याबद्दल ते वेळोवेळीच्या चाहत्यांना अपडेट्स देत असतात.  कुत्ते या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने अनेक मुलाखती दिल्या. यातील नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने मलायका त्याच्या आयुष्यात आल्यावर त्याच्या आयुष्यात काय बदल झाला हे सांगितलं आहे.

अर्जुन कपूर म्हणाला, ”आम्ही दोघं अनेक वर्ष एकमेकांना डेट करत आहोत. तिच्या माझ्या आयुष्यात येण्याने माझ्या आयुष्यात बराच बदल झाला. पण मला महत्त्वाची गोष्ट जाणवली की, तिला डेट करायला लागल्यापासून मला रोज रात्री शांत झोप लागते.” त्याच्या या उत्तरातून त्यांच्यातलं नातं किती घट्ट आहे पुन्हा एकदा त्याने चाहत्यांना दाखवून दिलं.

अर्जुन कपूर सध्या त्याच्या ‘कुत्ते’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला. परंतु हा चित्रपट चित्रपटगृहात फारशी चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये

मलायकाने मात्र या सिनेमाचं खूप कौतूक केलं आहे. सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट करत तिला हा चित्रपट आवडल्याचं तिने नुकतंच सांगितलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा या दोघांकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष वेधलं गेलं आहे.  

अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर अर्जुन आणि मलायका यांच्यातील जवळीक वाढली. दोघांनी त्यांचं नातं सर्वांसमोर मान्य देखील केलं आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मलायका आणि अर्जुनला लग्न कधी करणार असा प्रश्न सतत विचारण्यात येत आहे. Source link

Leave a Reply