आता काय म्हणे, कुरळ्या केसांच्या मुली कुरुप; मालिकेवरुन माजलं वादंग


मुंबई : मालिका किंवा कोणत्याही सीरिजमधून बहुविध कथानकं हाताळण्यात येतात. कथानकांच्या निमित्ताने वेगळे दृष्टीकोन समाजापुढे ठेवले जातात. पण, याच मालिकांच्या गर्दीमध्ये अनेकदा काही असे मुद्दे प्रकाशात येतात, जे खरंतर अगदीच रटाळ आणि तितकेच काळाला मागे नेणारे असतात. 

सध्या अशाच एका मालिकेतील नकारात्मक बाब सर्वांच्या मस्तकाची शीर ताणत आहे. 

‘मैं ऐसी क्यों हूं’  या पाकिस्तानी मालिकेवर सध्या नेटकऱ्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 

कुरळ्या केलांच्या मुली कुरूप असतात,  असं या मालिकेत दाखवण्यात आलं आहे.

नूर जफर खान आणि सईद जिबरान यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या मालिकेच्या पहिल्याच भागात म्हणे, मुख्य भूमिकेत असणारा अभिनेता कुरळ्या केसांसाठी पत्नीला कुरुप असल्याचं दर्शवतो. 

तू खरंच जशी आहेस, तसं आधी ठाऊक असतं तर मी लग्न केलं नसतं, सहा वर्षांपासून मी त्रस्त आहे. तूझं नैसर्गिक रुप तुला कुरुप करतं….तुझ्या या केसांबद्दल मला ठाऊक असतं तर मी कधीच लग्न केलं नसतं, असं हा अभिनेता म्हणताना दिसतो. 

कार्यक्रमातील हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. 

फक्त इतकंच नव्हे, तर या व्हिडीओवर निशाणा साधत वर्णावरून भेदभाव करणं संपलं आता केसांवरून सुरु झालं अशा शब्दांत नेटकऱ्यांनी कथानक लिहिणाऱ्यांच्या मानसिकतेला धारेवर धरलं. 

कुरळ्या केसांवरून होणारं हे वादंग पाहत, काही महिलांनी त्यांच्या कुरळ्या केसांतील सौंदर्याला जगासमोर आणलं. 

थोडक्यात काय, सोशल मीडियावर एका नव्या वादाला वाचा फुटली. आता हा वाद पाहता मालिकेकडून काही भूमिका घेतली जाते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Source link

Leave a Reply