आता बिनधास्त वापरता येणार AC, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास कमी येणार इलेक्ट्रिसिटी बिल, पाहा ट्रिक्स


नवी दिल्ली: अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या असून आता अनेकांनी त्यांचे जुने कुलर्स रिपेयर करायला सुरुवात देखील केली असेल. तापमान अधिक असल्याने उन्हाळ्यात Ac, फ्रीज, कुलर, वॉशिंग मशिनचा वापर जास्त होतो. त्यामुळे बिलही जास्त येणे स्वाभाविक आहे. ज्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होतो. मात्र काही सोप्या आणि आवश्यक टिप्स फॉलो केल्यास तुमचे वीज बिल ५० टक्क्यांनी कमी होऊ शकते आणि तुमची मोठी बचत देखील होऊ शकते. Solar Panel सेट करा: भारतात Solar Panel हा सर्वोत्तम पर्याय आहे. मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या सूर्यप्रकाशाचा तुम्ही फायदा घेऊ शकता. तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल लावू शकता. यामुळे तुमचे वीज बिल कमी होऊ शकते. ऑनलाइन रिसर्च करून तुम्ही ते तुमच्या घरानुसार इन्स्टॉल करू शकता आणि विजेचे बिल देखील कमी करू शकता.

वाचा: ‘हे’ पॉकेट फ्रेन्डली प्रीपेड प्लान्स आहेत प्रत्येक युजरसाठी परफेक्ट , पाहा यातील तुमच्यासाठी बेस्ट

LED लाईट्स वापरा: एलईडी लाइट कमी वीज वापरतात आणि चांगला प्रकाश देखील देतात. तुम्ही ५ स्टार रेटिंगसह उर्वरित डिव्हाइसेस देखील घेऊ शकता. त्यातही तुमच्या विजेची बचत होईल. तुम्ही अशा प्रकारे देखील विजेची बचत करू शकता: बल्ब आणि ट्यूबलाइटपेक्षा सीएफएल पाचपट विजेची बचत करत. त्यामुळे ट्यूबलाइटऐवजी सीएफएल वापरा. ज्या खोलीत तुम्हाला प्रकाशाची गरज नाही. तो, ट्यूबलाइट बंद करा. इन्फ्रारेड सेन्सर, मोशन सेन्सर आणि डिमर यासारख्या गोष्टी वापरा. उन्हाळ्यात AC पेक्षा सीलिंग आणि टेबल फॅनचा जास्त वापर करा. त्याची किंमत ३० पैसे प्रति तास आहे. तर, एसी १० रुपये प्रति तास वर चालतो.

जर तुम्हाला एअर कंडिशन वापरायचे असेल तर २५ डिग्री सेव्ह करून वापरा. यामुळे विजेचा वापरही कमी होईल. तसेच, ज्या खोलीत AC चालू आहे. त्या खोलीचा दरवाजा बंद करा. फ्रीजवर मायक्रोवेव्हसारख्या वस्तू अजिबात ठेवू नका. याचा परिणाम जास्त वीज वापरावर होतो. फ्रीज थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. रेफ्रिजरेटरभोवती हवेच्या प्रवाहासाठी पुरेशी जागा द्या. फ्रीजमध्ये गरम अन्न ठेवू नका. अन्न आधी थंड होऊ द्या. लॅपटॉप आणि टीव्ही चालू केल्यानंतर, वीज बंद करा. मॉनिटरला स्पीड मोडमध्ये ठेवा. फोन आणि कॅमेरा चार्जर वापरल्यानंतर तो प्लगमधून अनप्लग करा. प्लग इन केल्यावर, जास्त वीज वापरली जाते.

वाचा: Holi 2022: तुमच्या महागड्या स्मार्टफोनला रंग आणि पाण्यापासून ‘असे’ ठेवा सेफ, फॉलो करा या कूल टिप्स

वाचा: Samsung Galaxy F23 चे लॉंचिंग आज, फोन असू शकतो बजेट फ्रेन्डली, पण, चार्जर बॉक्समध्ये येऊ शकते ‘हे’ ट्विस्ट

वाचा: International Womens Day 2022: हे ट्रेंडी गॅझेट्स ठरतील बेस्ट गिफ्ट, लगेच खरेदी करा, पाहा लिस्ट

Source link

Leave a Reply