Headlines

Aashiqi चित्रपटातील हिरो आज कसा दिसतोय माहितीये का? Photo होतायत व्हायरल

[ad_1]

Aashiqi Film Actor Transformation: 1990 साली आलेला आशिकी (Aashiqi) हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्या या लोकप्रिय चित्रपटाचा सिक्वेल 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ रॉय कपूर (Shraddha Kapoor & Siddharth Roy Kapoor) यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपटही तेव्हाही खूप गाजला होता तसेच या चित्रपटाची गाणीही प्रचंड गाजली. (actor rahul roy transformation fans reacts big boss 1st winner aashiqi hero)

आशिकीच्या पहिल्या भागातून रूपेरी पडद्यावर दिसलेली अभिनेत्री आणि अभिनेता यांनाही या चित्रपटामुळे भरपूर प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलेला अभिनेता राहूल रॉय (Actor Rahul Roy) आज काय करतोय माहितीये का? 

बिग बॉस 16 (Bigg Boss 16) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोची गेल्या महिन्याभरापासून चर्चा होती. आता उद्यापासून हा शो सुरू होतो आहे. बिग बॉस या शोची कायमच चर्चा होत असते. नेहमीच या शोवरून कुठला ना कुठलातरी वादारंभ होतो. बिग बॉसचा पहिला विजेता राहूल रॉय (Bigg Boss Show First Winner Rahul Roy) या शोनंतर परत जास्त कुठे दिसला नाही. 

राहूल रॉल बिग बॉसमुळे सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. याआधी आशिकीप्रमाणे त्याचे चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. क्राइम पार्टनर (Crime Partner), ऐलान (Elaan), टू बी और नोट टू बी  (2B Or Not To B), नाइट एंड फॉग (Night And Fog), कैबरे (Kambaire), आगरा (Agra), अ थिन लाइन (A Thin Line) असे काही चित्रपट राहूल रॉयचे प्रदर्शित झाले पण ते फारच गाजले नाहीत. 

राहूल रॉयनं स्वतःच प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे. राहूल स्वतः एक बिझनेसमन आहे. त्याचसोबत तो सोशल मीडियावर सुद्धा अक्टिव आहे. आपले सगळे लाईव्ह अपडेट तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. राहूल यांना स्पिरिटच्यूलिटीची जाण आहे. त्याचबरोबर ते सगळीकडे फिरत असतात आणि त्याचे व्हिलॉगही शेअर करत असतात.

राहूल यांचा लुकही बदलला आहे. (Rahul Roy New Look) त्याचं वय सध्या 54 वर्ष ऐवढं आहे. त्यांचा लुक आता पुर्वीसारखा तारूण्याला राहिलेला नाही. चेहऱ्यावर त्यांचे वयही दिसून येते आहे. परंतु या वयातही त्यांनी स्वतःला चांगलंच मेटेंन केलं आहे.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *