आमिर जरा अतीच…. अमिताभ बच्चन नेमकं असं का म्हणाले?


मुंबई : आव्हानात्मक भूमिकाही अगदी सोप्या पद्धतीनं आणि तितक्याच प्रत्ययकारीपणे सादर करणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन यांना कायमच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. सध्या ते ‘झुंड’ या नागराज मंजुळे दिग्दर्शित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. (Jhund nagraj manjule amitabh bachchan )

चित्रपटातील बच्चन यांची भूमिका सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. परफेक्शनिस्ट आमिर खान यानंही या महानायकाचं तोंड भरुन कौतुक केलं. 

आमिरनं केलेली ही प्रशंसा पाहता बिग बी त्यावर जे म्हणाले त्यामुळंही सर्वांच्याच नजरा वळल्या. 

आमिर जरा अतीच… असं बच्चन म्हणाले आणि पाहणाऱ्यांच्या नजरा वळल्या. ते नेमकं असं का म्हणाले हे पुढेच लक्षात येतंय. 

काय म्हणाले बिग बी? 
‘आमिरचा जरा अतीच उत्साही असतो. पण, मी त्याचे यासाठी आभार मानतो. मला असं वाटतं की, तो चित्रपटांचा एक अतिशय चांगला समीक्षक आहे. ही आदराची बाब आहे, की चित्रपरटासाठी तो इतक्यामनापासून बोललाय’, असं बच्चन म्हणाले. 

नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या ‘झुंड’ या चित्रपटाच्या खास स्क्रीनिगनंतर आमिरनं संपूर्ण चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं होतं. 

‘बेहरीन…’ असं म्हणत या परफेक्शनिस्ट अभिनेत्यानं संपूर्ण टीमच्या अभिनयाला दाद दिली होती. आमिर चित्रपट पाहून इतका भारावला होता की त्याला अश्रूही थांबवता आले नाहीत. 

एका कलाकारानं कलेच्या या अप्रतिम नमुन्याला दिलेली ही दाद पाहता, केलेल्या कामाची सर्वोत्तम पोचपावती हीच… याचीच अनुभूती मिळतेय असं म्हणायला हरकत नाही. Source link

Leave a Reply