आमिर खानला नक्की झालंय काय? त्याची उत्तरं ऐकून तुम्हालाही पडेल हाच प्रश्न


मुंबई : अभिनेता आमिर खान बॉलिवूडमध्ये परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. चित्रपटांविषयीचं त्याचं ज्ञान असो किंवा मग एखाद्या विषयाबद्दलची त्याची समज असो. आमिर आणि त्याचं परफेक्ट वागणं हे एक अफलातून समीकरण आहे. पण आता हाच आमिर म्हणे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. (Bollywood Actor aamir khan gets trolled for his foolish answers in Koffee With Karan 7 )

हल्लीच निर्माता दिग्दर्शक करण जोहर याचं सूत्रसंचालन असणाऱ्या Koffee With Karan 7 या टॉक शोमध्ये त्यांनं हजेरी लावली. इथं आमिर अगदी सोबर लूकमध्ये आला. सूटाबुटात येणं मला जमत नाही, असं म्हणत आपल्याला जे आवडतं त्याच कपड्यांत मी येतो असं त्यानं कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. 

करणच्या प्रश्नांची उत्तरं देताना आमिर त्याच्याच धुंदीत असल्याचं पाहायला मिळालं. इतकंच काय, तर रॅपिड फायर राऊंडमध्ये त्यानं हद्दच ओलांडली. बॉलिवूड चित्रपटांची नावंही त्याला व्यवस्थित सांगता येईना. 

आता परफेक्शनिस्ट आमिरकडून अशी चूक होणं म्हणजे जरा विचित्रच नाही का? पण, त्यावरही माझ्या चित्रपटांची नावं लक्षात राहत नाहीत, मी जास्त चित्रपट पाहत नाही अशी कारणं देत तो सारवासारवही करु लागला. 

गप्पा सुरु असतानाच जेव्हा रॅपिड फायर राऊंट सुरु झाला, तिथंही आमिरनं वाईट कामगिरी केली. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंची नावं सांग, असा प्रश्न जेव्हा करणनं त्याला केला तेव्हा तिथंही आमिर डगमगला. रोहित शर्माऐवजी त्यानं तिथं रोहित शेट्टीचं नाव घेतलं. अक्षय कुमारनं ‘सुपर 30’ या चित्रपटात काम केलंय असंही तो म्हणाला. 

बस्स, या इतक्या चुकीच्या उत्तरानंतर नेटकरी शांत राहतील तर मानलं. लगेचच बॉलिवूडच्या या परफेक्ट अभिनेत्यावर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. Source link

Leave a Reply