Aamir Khan नंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर Saif Ali Khan, आदिपुरुष सिनेमातील सैफच्या लूकवरुन वाद


Adipurush Controversy : आदिपुरुष सिनेमाचा टीझर (Adipurush Movie Teaser) प्रदर्शित झाल्यापासून नवा वाद सुरू झाला आहे. सुपरस्टार प्रभासची (Prabhas) प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या व्हीएफएक्सवर (VFX) सोशल मीडिया यूजर्सनी (Social Media Users) वाईट टीका केली आहे. त्याची खिल्लीही उडवली आली. हा चित्रपट खरी पात्र असतानाही अॅनिमेटेड (Animated) दिसत असल्याचं यूजर्सचे म्हणणे आहे. याशिवाय सैफ अली खानचा (Saif Ali Khan) रावण अवतारावरही मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. 

सैफ अलीच्या लूकवर टीका
अखिल भारत हिंदू महासभेचे (Akhil Bharatia Hindu Mahasabha) राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी चित्रपटातील सैफ अली खानच्या लूकचा निषेध केला आहे.  सैफ अली खानला दक्षिण भारतीय चित्रपट आदिपुरुषमध्ये लंकापती रावणाच्या (Lankapati Ravan) भूमिकेत दाखवण्यात आलं आहे, पण प्रत्यक्षात तो एक खिलजी, चंगेज खान किंवा औरंगजेबसारखा दिसत असल्याचं स्वामी चक्रपाणी यांनी म्हटलंय. त्याच्या कपाळावर टिळा किंवा त्रिपुंड नाही. आमच्या  पौराणिक पात्रांशी छेडछाड करणं सहन केलं जाणार नाही, असा इशाराही हिंदू महासभेने दिलाय.

याशिवाय भाजपच्या (BJP) प्रवक्त्या मालविका ( Malavika Avinash) यांनीही आदिपुरुष सिनेमातील सैफ अलीच्या पात्रावर टीका केली आहे. त्यांनी एक फेसबूक पोस्ट (Facebook Post) केली असून त्यात त्यंनी म्हटलंय, वाल्मिकीचा रावण, इतिहासाचा रावण, लंकाधिपती, 64 कलांमध्ये पारंगत असलेले महाशिवभक्त. ज्याने आपल्या सिंहासनात 9 ग्रह बसवले होते, अशी त्यांची ख्याती होती. मग हे व्यंगचित्र काढायची काय गरज होती?  बॉलीवूडचे लोक किती मूर्ख आहेत. थोडं संशोधनही करू शकत नाही, असा खोचक टोला मालविका यांनी लगावला आहे. 

आदिपुरुषच्या टीझरमध्ये सैफ अली खानचा लूक पूर्णपणे वेगळा दिसत आहे. रावणाच्या अवतारात दिसत असलेल्या सैफचे केस लहान आहेत. त्याने काळ्या रंगाचा पोशाख घातला आहे आणि तो खूपच भयानक दिसत आहे. पुष्पक विमानाऐवजी सैफ वटवाघुळा सारख्या प्राण्यावर उडताना दाखवला आहे. त्याचा हा लूक सोशल मीडिया यूजर्सना अजिबात आवडला नाही. ट्विटरवर त्याच्या लूकची खिल्ली उडवली जात आहे.

सोशल मीडिआवर खिल्ली
सोशल मीडिया यूजर्सनी सैफ अली खानच्या रावण अवताराची खिलजीसोबत तुलना केली आहे. दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांच्या चित्रपटातील रावण हा खऱ्या रामायणातील रावणापेक्षा पूर्णपणे वेगळा असल्याचं यूजर्सचं म्हणणं आहे. आदिपुरुषच्या टीझरमध्ये दाखवण्यात आलेली लंका लोकांना फारशी आवडलेली नाही. त्याचं व्हीएफएक्सही कार्टून सिनेमासारखं वाटत असल्याचं युझर्सचं म्हणणं आहे.  हा टीझर इतका अॅनिमेटेड दिसत आहे की एखादं कार्टून चॅनेल या सिनमाचे हक्क विकत घेईल आणि आपल्या चॅनेलवर कार्टून चित्रपट म्हणून दाखवेल, असंही युझर्सने म्हटलं आहे. 

दिग्दर्शक ओम राऊत यांचा हा चित्रपट रामायणाच्या गाथेवर आधारित आहे. यामध्ये प्रभास रामच्या भूमिकेत दिसणार आहे. क्रिती सेनॉन (Kriti Sanon) सीतेच्या भूमिकेत, सनी सिंह निज्जर लक्ष्मणच्या भूमिकेत, सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आणि अभिनेता देवदत्त नागे (Devdutta Nage) हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.Source link

Leave a Reply