आम्ही सर्वकाही गमावलं…; मुंबईच्या 6 पराभवानंतर जसप्रीत बुमराह निराश!


मुंबई : यंदाच्या इंडियन प्रिमीयर लीगमध्ये मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. मुंबईने आतापर्यंत 6 सामने खेळले असून एकाही सामन्यात मुंबईला विजय मिळवता आलेला नाही. सलग 6 पराभवांचा सामना करावा लागल्यामुळे मुंबईला सोशल मीडियावरही ट्रोल केलं जातंय. अशातच मुंबईचा घातक गोलंदाज जसप्रीत बुमराहने मोठं विधान केलं आहे. 

लखनऊविरूद्ध 18 रन्सने पराभव स्विकारल्यानंतर जसप्रीत बुमराह म्हणाला, हा आमचा अंत नाहीये, सूर्य पुन्हा उगवणार आहे. हा तर फक्त एक क्रिकेटचा खेळ आहे. यामध्ये एक टीम हरणार आणि एक टीम जिंकणार आहे. आम्ही सर्वकाही गमावलं नसून केवळ एक गेम गमावला आहे. हीच भावना आमच्या टीमच्या मनात आहे. 

आम्ही जी मेहनत करतो, ती मेहनत बाहेरून कोणी पाहत नाही. पॉईंट टेबल खोटं बोलत नाहीत आणि आम्ही उर्वरित सामन्यांमध्ये आमची बेस्ट कामगिरी करू देऊ. टीम नवीन आहे, प्रत्येकजण स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही सकारात्मक गोष्टी पाहतोय, असंही बुमराहने सांगितलंय. 

आम्ही आमच्या चुका लक्षात घेऊन त्या सुधारण्याचा प्रयत्न करू. पराभव कोणालाही आवडत नाही. आम्ही काय करू शकतो यावर आम्ही काम करू. आम्ही फार चांगले नाही आहोत, हे मी मानतो, असंही बुमराह म्हणाला. 

मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक सामन्याच्या वेळी चाहत्यांचा हिरमोड होताना दिसतोय. यंदाचा सिझन हा मुंबई इंडियन्ससाठी जणू एक वाईट स्वप्नच आहे. सहा सामने झाले असून एकाही सामन्यात मुंबईला विजय मिळवता आलेला नाही. काल झालेल्या लखनऊ सुपर जाएंट्सविरूद्धच्या सामन्यात 18 रन्सने पराभव झाल्याने हा मुंबईचा सलग सहावा पराभव ठरला आहे. Source link

Leave a Reply