Headlines

आलियाचे बेबी बंप पाहून या सुप्रसिद्ध अभिनेत्री केली कमेंट, म्हणाली ”तूला शोभत…”

[ad_1]

Alia Bhatt Preganancy: रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ब्रम्हास्त्र हा चित्रपट येत्या सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होतो आहे. नुकताच या चित्रपटाच्या देवा देवा या गाण्याचा प्रिव्हयू शो मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या शोच्या निमित्ताने आलियाने घातलेला ब्राऊन ड्रेस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत होता. आलियाचा बेबी बंपही त्यात दिसून येत होता. 

आलियाने आपल्या या लुकचे फोटो इन्टाग्रामवर शेअर केले आहेत. डार्क चॉकलेट रंगाच्या ब्रॅलेटवर आलियाने ब्राऊन रंगाचा रॅप ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच आकर्षक दिसत होती. आपला हा फोटो शेअर करताना आलियाने लिहिले आहे की all set to see deva deva with the press … & my little darling…#DevaDeva out on the 8th of August! 

आलियाच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस टाकला आहे. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी आलियाच्या या फोटोवर भरपूर इमोजी शेअर केले आहेत. त्यातील एक कमेंट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते आहे आणि ती म्हणजे अभिनेत्री मलायका अरोराची कमेंट. मलायका म्हणते, आलिया, तूला हे बेबी बंप शोभून दिसते आहे. मलायकाच्या या कमेंटला अनेकांनी लाईक केले आहे. 

या शोला अभिनेता आणि आलियाचा पती रणबीर कपूरसह दिग्दर्शक अयान मुखर्जी देखील उपस्थित होते. शोच्या बाहेर आलिया आणि रणबीर स्पॉट झाले होते. त्यांचे त्यावेळी एकमेकांबद्दलचे प्रेम पाहून चाहत्यांनी जोडप्याला शुभेच्छा दिल्या. 

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘डार्लिंग्स’ या चित्रपटातील आलियाच्या अभिनयासाठी आलियाला प्रेक्षकांचे आणि समीक्षकांचे कौतुक आणि प्रेमही मिळत आहे. या चित्रपटाद्वारे आलियाने चित्रपट निर्माता म्हणूनही पदार्पण केले आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *