Headlines

एक्स बॉयफ्रेंडच्या लग्नात जाणार का आलिया? त्याच्या गर्लफ्रेंडनेच व्यक्त केली इच्छा

[ad_1]

मुंबई : ‘कॉफी विथ करण’ हा शो लोकप्रिय टॉक शोपैकी एक आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. यावेळी त्यांच्या खासगी आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्याविषयी अनेक मजेदार खुलासे करतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये कियारा अडवाणी आणि शाहिद कपूरनं हजेरी लावली होती. दरम्यान, गेल्या एपिसोडमध्ये करणनं खुलासा केला की सिद्धार्थ आणि कियारा रिलेशनशिपमध्ये आहेत. तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये कियाराला त्यांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला. 

शो दरम्यान, शाहिदनं कियारा आणि सिद्धार्थ ​​यांची जोडी ही खूप सुंदर असल्याचे म्हटले आहे. शो दरम्यान, करण आणि शाहिद कियाराला तोपर्यंत, जो पर्यंत अभिनेत्री सिद्धार्थसोबतच्या तिच्या रिलेशनशिपवर उघडपणे काही बोलत नाही. 

आणखी वाचा : ‘आजकाल तर त्यापेक्षा…’, ब्रेस्टफीडिंगच्या सीनवरील टीकेवर मंदाकिनीचं सडेतोड उत्तर

कियारानं चॅट शोमध्ये तिच्या लग्नाच्या नियोजनाबद्दल सांगितले. कियारा म्हणाणी, ‘माझा आधीपासून लग्नावर विश्वास आहे. मी माझ्या घरी लग्नानंतरचं एक सुंदर आयुष्य पाहिलं आहे. त्यामुळे मला माझ्या आयुष्यात तेच करायचं आहे पण कॉफी विथ करणवर मी आज त्याबद्दल काहीही सांगणार नाही आणि नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करेन.’ 

आणखी वाचा : फोटोत दिसणारी ही चिमुकली पद्मश्रीनं सन्मानित ते बॉलिवूड स्टारची पत्नी, ओळखलं का?

रॅपिड फायर राउंड दरम्यान, करणनं कियाराला प्रश्न विचारला की कोणती सेलिब्रिटी तुझ्या ब्राइड स्क्वॉडमध्ये असेल? यावर उत्तर देत ‘मला आलिया भट्ट खरोखर आवडते आणि तिनं ब्राइड स्क्वॉडमध्ये असावे असे मला वाटते. ती खूप क्यूट आहे.’

आणखी वाचा : मालदीवच्या बीचवर अर्जुन कपूरच्या बहिणीचा Hot Look, पाहून मलायकालाही येईल कॉम्प्लेक्स

‘कॉफी विद करण’ च्या 7व्या सीझनमध्ये आतापर्यंत आलिया भट्ट, रणवीर सिंह, अर्जुन कपूर, सोनम कपूर, जान्हवी कपूर, सारा अली खान, अक्षय कुमार, समांथा रुथ प्रभू, अनन्या पांडे, विजय देवरकोंडा, करीना कपूर, आमिर खान या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *