आघाडीच्या गायिकेच्या पतीला सलमान खाननं रडवलं, काय आहे प्रकरण?


मुंबई : अभिनेता सलमान खान हा सहसा त्याच्या कलाजगतातील मैत्रीसाठी आणि लोकप्रियतेसाठी ओळखला जातो. पण, आता मात्र त्याचं नाव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. हे कारण जास्तच गंभीर आहे. कारण, सलमानवर एला लोकप्रिय बॉलिवूड गायिकेनं काही आरोप केले आहेत. 

ही गायिका आहे, सोना मोहापात्रा. पती, राम संपत कशा प्रकारे कामाहून परतल्यानंतर एकट्यातच हमसून रडत बसायचा असं सांगतनाना सोनानं सलमानवरही काही आरोप केले. (Singer Sona Mohapatra husband cried was salman khan reason behind that)

पॉर्न साईटवर फोटो आणि… 
सलमानच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळं आपल्यासोबत अत्यंत वाईट गोष्टी घडल्याचा गौप्यस्फोट तिनं केला. दरम्यानच्या काळात तिला बलात्काराच्या धमक्याही आल्या. इतकंच नव्हे, तर तिचे काही मॉर्फ्ड फोटो पॉर्न वेबसाईटवरही पाहायला मिळाले. 

सलमानला झालेले गैरसमज आणि त्याच्या वक्तव्यावरून खडे बोल सुनावल्यामुळे अनेकांना पैसे देऊन फोटो व्हायरल करणं आणि इतर वाईट गोष्टी करवून घेतल्याचे आरोप तिनं केले होते. 

का रडला सोनाचा पती? 
सोनासोबत घडणाऱ्या या सर्व घटनांचे पडसाद तिच्या कुटुंबावर पडत होते. तिचा पती, राम संपत यामुळं इतका तणावात होता की अनेकदा स्टुडिओतून घरी परतल्यानंतर तो हमसून हमसून रडत बसे. 

 

हे सर्व प्रकरण तेव्हाचं आहे, जेव्हा सलमाननं ‘सुलतान’ चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यानच्या एका कार्यक्रमात आपण चित्रीकरणादरम्यान, प्रचंड मेहनत केल्यामुळं आपली अवस्था एखाद्या बलात्कार पीडितेप्रमाणे झाल्याचं तो म्हणाला होता. या वक्तव्यानंतर सलमानला चौफेर टिकेचा सामना करावा लागला होता. सोना मोहापात्रानंही त्याला या मुद्द्यावर खडे बोल सुनावले होते. Source link

Leave a Reply