आगळी वेगळी साडी, मैत्रीणींची गर्दी; रश्मिकाचे Wedding Photo व्हायरल


मुंबई : ‘पुष्पा’ या चित्रपटातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या आणि विविधभाषी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेल्या अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचे नवे फोटो बऱ्याच चर्चांना वाव देत आहेत. मागील काही दिवसांपासून रश्मिकाच्या खासगी आयुष्यातील घडामोडी  बऱ्याच चर्चेत आल्या. (Pushpa fame rashmika mandanna)

चर्चा या कारणासाठी, की रश्मिकाचं लग्न नेमकं कोणाशी होणार. अभिनेता विजय देवरकोंडा याच्याशी असणारी त्याची मैत्री किंबहुना मैत्रीहूनही अधिक महत्त्वाचं नातं पाहता ती खरंच त्याच्याशी लग्न करणार ? असा प्रश्नही चाहत्यांनी विचारला. 

इथं रश्मिकाच्या लग्नाबद्दल काहीच स्पष्ट होत नाही, तोच आता सोशल मीडियावर थेट तिचे लग्नातील फोटो व्हायरल होत आहेत. 

मैत्रिणींचा गराडा आणि मधोमध रश्मिका, असंच एकंदर चित्र या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. 

रश्मिकानं नेसलेली साडी आणि तिच्या इतर मैत्रिणींचीही वेशभूषा पाहता, ही नेमकी कोणाशी लग्न करतेय ? असाच प्रश्न चाहत्यांनी विचारला. 

मुळात मुद्दा असा, की तुम्हालाही असं वाटत असल्यास शंका दूर करा. कारण, हे काही रश्मिकाचं स्वत:चं लग्न नाही. 

रश्मिका मंदाना

बालपणीच्या मैत्रिणीच्या लग्नानिमित्त रश्मिका या लूकमध्ये सर्वांसमोर आली आणि पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. ब्राईड्स मेड असल्यामुळं यावेळी रश्मिका आणि तिच्या मैत्रिणींचा अजबच तोरा इथं पाहायला मिळाला. 

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना

मैत्रिणीच्या लग्नात मिरवणारी हीच रश्मिका आता तिच्या लग्चाचीच गोड बातमी केव्हा देणार याचीच उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे. Source link

Leave a Reply