“गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते,” सुहास कांदेंच्या आरोपानंतर आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र | aditya thackeray criticizes suhas kande on development of nashik and manmad



शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज नाशिकमधील मनमाड दौऱ्यावर असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मनमाडच्या विकासात आदित्य ठाकरेंचं एक टक्कादेखील योगदान नाही. नांदगाव मतदारसंघात येऊन तुमच्या पर्यटन खात्याचा एक प्रकल्प दाखवा, असे आव्हान कांदे यांनी आदित्य ठाकरेंना केले आहे. कांदे यांच्या याच आव्हानाला आदित्य यांनी उत्तर दिले आहे. शिवसैनिकांच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला मी कटीबद्ध आहे. गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते, असे आदित्य ठाकरे यांनी कांदे यांच्यावर त्याचे नाव न घेता टीका केली आहे.

हेही वाचा >>>“धमक्या कोणाला देत आहात?”, केसरकर आदित्य ठाकरेंवर संतापले, म्हणाले “बाळासाहेबांचे नातू आहात म्हणून…”

“जी वचनं होती ती पूर्ण केलेली आहेत आणि अजूनही करत आहोत. पाठीत खंजीर का खुपसला हे राजकारण मला अजूनही समजलेलं नाही. याआधी मी मनमाडमध्ये आलो होतो. आपले सरकार आले तर पाणीपुरवठा योजनेचा पाठपुरावा करेन, असे मी आश्वासन दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना या योजनेसाठी ३०० कोटी रुपये मंजूर करुन दिले. पण स्वत:साठी काहीही आरोप केले जात आहेत. या टीकांना मी उत्तरं देत बसणार नाही. गद्दार नसते तर उत्तरं दिली असती. गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी कांदे यांचे नाव न घेता केली.

हेही वाचा >>> विश्लेषण : काली बेई नदीतील पाणी प्यायल्याने पंजाबचे CM भगवंत मान रुग्णालयात दाखल? शिखांसाठी ही नदी पवित्र का आहे?

“शिवसैनिकांनी प्रश्न विचारले असते तर मी उत्तर द्यायला कटीबद्ध आहे. पण गद्दांराना मी उत्तर देणार नाही. गद्दारांनी गद्दारी का केली, याचं उत्तर अगोदर द्यावं. पर्यटन खात्याला कधीही निधी मिळत नव्हता. मात्र आमच्या सरकारने पर्यटन खात्याला १७०० कोटी रुपये दिले. मनमाडमध्ये मी आठ कोटी रुपयांचा फंड दिला आहे,” अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा >>> ‘ब्रम्हास्त्र’मधील ‘केसरिया’ गाणं ट्रोल करणाऱ्यांना रणबीर कपूरचं सडेतोड उत्तर, म्हणाला, “आजच्या काळात मीम्स, ट्रोलिंग म्हणजे…”

सुहास कांदे काय म्हणाले होते?

“आदित्य ठाकरे आतापर्यंत एकदाच मनमाडला आले आहेत. मनमाडच्या विकासात आदित्य ठाकरेंचं एक टक्कादेखील योगदान नाही, हे मी छातीठोकपणे सांगतो. आदित्य ठाकरेंनी हा प्रकल्प मी दिला आहे आणि त्यासाठी पैसे दिल्याचं सांगून दाखवावं. मनमाड शहरात किंवा नांदगाव मतदारसंघात येऊन तुमच्या पर्यटन खात्याचा एक प्रकल्प दाखवा,” असं असे आव्हान सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरेंना दिले होते.



Source link

Leave a Reply