Headlines

“सर्कसमध्ये काहीही…” शिंदे गटाने शिवसेनेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करताच आदित्य ठाकरेंची टीका | aditya thackeray criticizes eknath shinde group of forming new shivsena executive committee

[ad_1]

एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करुन नवी राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केली आहे. या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर दिपक केसरकर यांची प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या या निर्णानंतर शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या लोकशाहीची थट्टा सुरु आहे. आमच्याकडून राजकारण कमी झालं. सर्कसमध्ये काहीही होऊ शकतं, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> “…तर कायदेशीर आव्हान दिले जाईल,” १२ खासदारांच्या बंडखोरीच्या चर्चेनंतर संजय राऊतांचे महत्त्वाचे विधान

“सर्कसमध्ये काहीही होऊ शकते. राज्यात जे सुरु आहे ते घटनाबाह्य आहे. ही लोकशाहीची थट्टा सुरु आहे. मी याकडे जास्त लक्ष देत नाहीये. आमच्याकडून राजकारण कमी झालं, हा आमचा दोष असू शकतो. चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसते. त्यामुळे हादेखील आमचा दोष असू शकतो. आम्ही लोकांची २४ तास सेवा करत आहोत. आमचं हे काम अजूही सुरु आहे,” असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> “खासदार फुटणार याची कल्पना उद्धव ठाकरेंना होती,” शिवसेनेच्या बड्या नेत्याचे विधान

दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने आज शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करुन नवी कार्यकारिणी स्थापन केली आहे. या कार्यकारिणीमध्ये शिवेसेनेतील बंडखोर आमदार आणि नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांना शिवसेना मुख्यनेते म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर दिपक केसरकर यांची प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तानाजी सावंत, विजय नहाटा, यशवंद जाधव, गुलाबराव पाटील यांची शिवसेना उपनेते म्हणून तर आज शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांचे नाव कायम ठेवण्यात आले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *