आधी प्रेम, मग लग्न…; बॉलिवूड जोडीवर 600 मेसेजेसची बरसात, पण शुभेच्छांऐवजी जे लिहिलं ते पाहून धक्काच बसेल


मुंबई : सहसा लग्न झाल्यानंतर आपण एखाद्या व्यक्तीला थेट जाऊन भेटलो नाही, तर त्यांना मेसेज किंवा फोन करुन शुभेच्छा देतो. पण, इथं एका लोकप्रिय बॉलिवू़ड सेलिब्रिटी जोडीला मात्र याच्या संपूर्ण विरुद्ध अनुभव आला. जिथं प्रेमाच्या नात्याला या जोडीनं लग्नाचं नाव दिलं खरं. पण, त्यांच्या या नात्याची सुरुवात मात्र विचित्र मेसेजेसनं झाली.

ही जोडी आहे अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी यांची. नेहा आणि अंगद या दोघांनीही जवळपास चार वर्षांपूर्वी लग्न केलं. कसलीही चर्चा नाही, गाजावाजा नाही, एकाएकी त्यांच्या लग्नाचीच माहिती समोर आली आणि पाहणारेही हैराण झाले. (Neha Dhupia Angad Bedi) 

लग्नानंतर या जोडीला 600 मेसेजेस आले होते. पण, या सर्व मेसेजेसमध्ये शुभेच्छा नव्हत्या. तर, असं काही लिहिलं होतं जे पाहून त्यांनाही धक्का बसला. 

‘वॉट द f**k!’ असंच लिहित सर्वांनी ‘तुमचं लग्न झालं?’ अशा थक्क होणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. अंगद आणि नेहाच्या लग्नानंतर कोणाचाही यावर विश्वासच बसत नव्हता. त्यामुळं सर्वजण अशाच पद्धतीनं इथं व्यक्त होताना दिसले. 

नेहा आणि अंगदसाठीही या प्रतिक्रिया अनपेक्षितच होत्या. पण, तो क्षण मात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा असल्यामुळं ते त्या क्षणात जगताना दिसले. 

आपण लग्न अतिशय छोटेखानी पद्धतीनं झाल्यामुळं आम्ही लोकांना अंदाज बांधण्यास आणि चर्चा करण्यासच वाव दिला अशी खंत करण्यारी प्रतिक्रिया नेहानं माध्यमांशी संवाद साधताना दिली. आपल्या लग्नावर शुभेच्छांऐवजी प्रश्नच जास्त उपस्थित करण्यात आले, असं म्हणत तिनं तीव्र नाराजी व्यक्त केली.Source link

Leave a Reply