Headlines

Aadhar Update: आधार कार्डवरचा फोटो खराब आलाय? असा करा अपडेट, पाहा स्टेप्स

[ad_1]

नवी दिल्ली: Aadhar Update : भारतातील तुमची ओळख उघड करण्यासाठी आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. काम सरकारी असो वा खाजगी, आधार कार्डची सर्वत्र गरज असते. विशेष म्हणजे आधार कार्डच्या मदतीने तुम्ही सरकारी सुविधांचा लाभ देखील घेऊ शकता. घेऊ शकता. पण, आधार कार्डवरील फोटो खराब आहे अशी अनेकांची तक्रार असते. तर, काहींना त्यांचा फोटो आवडला नसतो. तुम्हालाही आधार कार्डवरील फोटो आवडला नसेल तर तो तुम्ही बदलू शकता. यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. ऑनलाइन माध्यमातून आधार कार्डचा फोटो कसा बदलायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: जबरदस्त फीचरसह येणाऱ्या ‘या’ 5G Smartphones चा मार्केटमध्ये धुमाकूळ, डिझाईन पाहून पडाल प्रेमात

UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येते आणि आधारचा फोटो बदलून त्‍याच्‍या जागी दुसरी चांगली इमेज अपडेट करता येते. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मदतीने तुम्ही आधारमध्ये नाव, मोबाइल नंबर, पत्ता, लिंग, जन्मतारीख आणि फोटो बदलू शकता. जर तुम्हाला या प्रक्रियेबद्दल माहिती नसेल तर , पाहा डिटेल्स.

वाचा: Android Smartphone मध्ये ‘या’ समस्या येत असतील तर, काळजी नको, फॉलो करा टिप्स

Aadhar Card मध्ये फोटो अपडेट करण्याची ही सर्वात सोपी प्रक्रिया:

सर्वप्रथम आधार कार्डमध्‍ये फोटो अपडेट करण्‍यासाठी, प्रथम तुम्हाला UIDAI वेबसाइटवर जावे लागेल.आता तुम्हाला आधार विभागात जाऊन आधार नोंदणी फॉर्म अपडेट फॉर्म डाउनलोड करावा लागेल आणि भरावा लागेल. त्यानंतर तो पर्मनंट एनरोलमेंट केंद्रात सबमिट करावा लागेल. येथे तुमचे बायोमेट्रिक तपशील घेतले जाईल. नंतर तुम्हाला प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १०० रुपये जमा करावे लागतील. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला एक रिसिट दिली जाईल ज्यामध्ये युआरएन असेल. URN वापरून, तुम्ही अपडेट पाहू शकता. नंतर तुमच्या आधारची इमेज अपडेट होईल.

वाचा: Battery Tips: फेस्टिव्ह सिझनमध्ये फोनचा अधिक वापर होतोय ?असा वाढवा बॅटरी बॅकअप, पाहा टिप्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *