आधार कार्डशी मोबाइल नंबर लिंक आणि नवीन नंबर असा अपडेट करा, पाहा सोपी ट्रिक


नवी दिल्लीः आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण डॉक्यूमेंट आहे. नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. सोबत नवीन सिम कार्ड खरेदी करण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी तसेच बँक अकाउंट ओपन करण्यासाठी किंवा शाळेत प्रवेश घेण्यासाठी आधार कार्डची गरज भासते. आज आधार कार्डची सेवा ऑनलाइन केली जावू शकते. यासाठी तुम्ही आधार कार्ड मोबाइल नंबरशी लिंक करू शकता. जर तुम्ही आधार कार्डशी मोबाइल नंबर बदलू पाहत असाल तसेच तुम्हाला नवीन मोबाइल नंबर अपडेट करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती देत आहोत.

आधार कार्डशी लिंक मोबाइल नंबर कसं ओळखाल
आधार कार्डशी लिंक मोबाइल नंबर ऑनलाइन घरी बसून ओळखू शकता. यासाठी तुम्हाला सर्वात आधी UIDAI च्या ऑफिशियल वेबसाइट ओपन करावी लागेल.

स्टेप 1 – UIDAI च्या ऑफिशियल वेबसाइट वर My Aadhaar वर लॉगइन करा.
स्टेप 2 – या ठिकाणी तुम्हाला ‘व्हेरिफाय आधार’ वर क्लिक करावे लागेल.
स्टेप 3 – आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड भरल्यानंतर सब्मिटवर क्लिक करा.
स्टेप 4 – पुढील पेजवर तुम्हाला आधार कार्ड संबंधी माहिती मिळेल. यासोबत आधार कार्डशी लिंक मोबाइल नंबरचे शेवटचे चार अंक पाहायला मिळू शकतात. यावरून तुम्ही आधार कार्डवरील रजिस्टर्ड मोबाइल नंबर ओळखू शकतात.

वाचाः वर्षभर Amazon Prime फ्री, नेटफ्लिक्सही मोफत, जिओच्या सर्वात स्वस्त प्लानमध्ये ५०० जीबी डेटा

आधार कार्डशी नवीन मोबाइल नंबर लिंक कसे कराल
आधार कार्डशी नवीन मोबाइल नंबर लिंक करणे खूप सोपे आहे. तुम्ही घरी बसून सहज आपल्या लॅपटॉप किंवा कंम्प्यूटरवरून हे काम करू शकता.

स्टेप 1 – सर्वात आधी आपल्या डिव्हाइसमध्ये UIDAI ची ऑफिशियल वेबसाइट https://uidai.gov.in/ ओपन करा आणि My Aadhaar मध्ये लॉगइन करा. आता तुम्हाला “Aadhaar Services” वर क्लिक करावे लागेल.

स्टेप 2 – आता तुम्हाला “Update your Mobile Number” लिंक पाहायला मिळू शकते.

स्टेप 3 – ओपन झालेले नवीन पेज वर तुम्हाला आपला 12-अंकाचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरून “Send OTP” बटनवर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला रजिस्टर्स मोबाइल नंबर मध्ये OTP मिळेल. त्याला भरून “Submit” बटनवर क्लिक करा.

स्टेप 4 – OTP सब्मिट केल्यानंतर तुम्हाला नवीन मोबाइल नंबर विचारला जाईल. तो भरा. आणि “Submit” वर क्लिक करा.

आता मोबाइल नंबर व्हेरिफाय करण्यास सांगितले जाईल. तुमचा नवीन मोबाइल नंबरवर UIDAI कडून ओटीपी द्वारे व्हेरिफाय करा. तुमचा नवीन मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक केला जाईल.

वाचाः मोदी सरकारने आधार कार्ड संबंधी घेतला मोठा निर्णय, निवडणुकीआधीच दिली गोड बातमी

Source link

Leave a Reply