Headlines

Aadhaar Card सोबत मोबाइल नंबर Add करण्याची झंझट संपली, फक्त फॉलो करा या सोप्या टिप्स

[ad_1]

नवी दिल्लीः आधार कार्ड सोबत मोबाइल नंबर जोडण्यासाठीची झंझट संपली आहे. जर तुम्ही तुमचे आधार कार्ड मिळवू इच्छित असाल तर तुम्हाला आता मोबाइल नंबरची गरज नाही. फक्त यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो करायच्या आहेत. या टिप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही खूपच सोप्या पद्धतीने तुमचे आधार कार्ड मिळवू शकता. यासाठी कोणकोणत्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत, याची सविस्तर माहिती या ठिकाणी दिली आहे. जाणून घ्या डिटेल्स.

रजिस्टर्ड मोबाइल नंबर विना आधार कार्ड मिळवण्याची पद्धत
रजिस्टर्ड मोबाइल नंबर विना तुम्ही ऑनलाइन आधार कार्ड मिळवू शकत नाहीत. तुम्ही मोबाइल विना खाली दिलेल्या स्टेप्स द्वारे आधार कार्ड मिळवू शकता.

वाचा: Upcoming Smartphones: नवीन स्मार्टफोनचा प्लान असेल तर करा थोडी प्रतीक्षा, या महिन्यात एन्ट्री करणार ‘हे’ पॉवरफुल स्मार्टफोन्स

स्टेप १ – आपल्या आधार नंबर सोबत जवळच्या आधार सेंटरवर जा.

स्टेप २ – या ठिकाणी आवश्यक बायो मीट्रिक डिटेल्स व्हेरिफिकेशन जसे, थंब व्हेरिफिकेशन आणि रेटिना स्कॅन आदीची पूर्तता करा.

स्टेप ३ – आपले दुसरे ओळखपत्र जसे, पॅन कार्ड, ओळखपत्र सोबत घेऊन जा.

स्टेप ४ – प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्ही सेंटर वर संबंधित व्यक्ती तुम्हाला आधारचे प्रिंट आउट देईल. सामान्य पेपर फॉर्मच्या आधारसाठी ५० रुपये तर पीव्हीसी व्हर्जनसाठी १०० रुपये द्यावे लागेल.

वाचा: LED Bulb: २०० रुपयांपेक्षा कमीमध्ये खरेदी करा ‘हा’ अनोखा Bulb, जबरदस्त बॅकअपसह वीज बिलात देखील होणार बचत

कोणताही व्यक्ती आधार सेंटर किंवा बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जावून आधार कार्डसाठी एनरॉल करू शकतो. यानंतर UIDAI कडून जारी करण्यात आलेल्या एनरोलमेंट साठी आयडी, व्हर्च्युअल आयडी द्वारे आपले आधार कार्ड प्रिंट करू शकतो. एकदा आधार नंबर जारी केल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने आधार डाउनलोड किंवा प्रिंट करू शकतो. आज आम्ही तुम्हाला याची माहिती सांगणार आहोत, ज्यांच्या आधारवर रजिस्टर्ड मोबाइल नंबर नाही तर कोणत्या पद्धतीने आधार कार्ड प्रिंट करू शकता. सोबत आधार कार्डचा वापर कोणत्याही सरकारी योजना मिळवण्यासाठी केला जावू शकतो.

वाचा: New WhatsApp Feature: येतय भन्नाट फीचर, नवीन अपडेटमध्ये बदलणार WhatsApp स्टेटसचा लुक, पाहा डिटेल्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *