Headlines

आडम मास्तर विचार मंच वतीने रक्तदान – अन्नदान कार्यक्रम

सोलापूर – आडम मास्तर विचार मंच च्यावतीने माजी आमदार कॉ आडम मास्तर व माजी नगरसेवक कॉ व्यंकटेश कोंगारी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.


यामध्ये 1जून रोजी आडम मास्तर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले होते. यामध्ये 68 रक्त दात्यांनी रक्तदान केले.


2 जून रोजी व्यंकटेश कोंगारी यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर निवारा केंद्र येथे व शहरातील विविध ठिकाणी बेघराना जेवण वाटप करण्यात आले.


सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आडम मास्तर विचार मंचाचे संस्थापक अशोक बल्ला, सनी कोंडा, शिवा श्रीराम , रविंद्र गेंट्याल, श्रीनिवास कुणे, प्रवीण जिल्ला, नागेश कैंचगुंडी, नरेश जोरीगल, अशोक वासी, पांडू जोरीगल व विचार मंचाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *