आ गले लग जा… अभिनेत्री का देतेय स्वत:ला मिठी मारण्याची संधी?


मुंबई : कोरोनाचं संकट आल्या क्षणापासून सुरक्षित अंतर पाळा, कोरोना टाळा…. हे आपण ठिकठिकाणी ऐकलं असेल. मुळात या कोरोनानं भीती आणली पण, त्यासोबतच माणसामाणसांमधयलं अंतरही वाढवलं. हे अंतर आता इतकं वाढत गेलं की मनानेही आपण एकमेकांपासून दुरावल्याची भावना बळावत गेली. 

पण, यातही एका अभिनेत्रीनं सर्वांनाच मिठी मारत आणि मिठी मारण्याची संधी देत एका आगळ्या वेगळ्या मार्गाने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. 

ही अभिनेत्री आहे, रिचा चड्ढा. रिचानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘Free Hugs’ असं लिलिहेला एक पोस्टर तिच्या हातात दिसत आहे. 

फुटपाथवर उभी राहून, हातात बॅनर घेऊन रिचा येणाऱ्याजाणाऱ्यांना मिठी मारताना दिसत आहे. 

रिचाचा व्हिडीओ सर्वांची मनं जिंकतोय. पण, इथे कमेंटमध्ये अनेकांनीच कोरोना आहे, मास्क कुठंय? असे प्रश्नही केले आहेत. 

तर, खुद्द रिचानंच कॅप्शनमधून याचं उत्तर अप्रत्यक्षपणे दिलं आहे. कारण, हा व्हिडीओ जोन वर्षांपूर्वीचा आहे. 

Kindness Day च्या दिवशी रिचानं आपण नेमकं काय केलेलं हे सांगणारा हा व्हिडीओ शेअर केला. जिथं काही काळातच जग किती बदललं आहे याकडे तिनं लक्ष वेधलं. 

कोरोनाची लाट येण्यापूर्वी आपण नेमकं काय- काय करु शकत होतो हे आठवत तिनं येत्या काळातही परिस्थिती पूर्ववत होईल अशी आशा व्यक्त केली. 

या जगाला सध्या निस्वार्थ प्रेमाची गरज असल्याचा सूर तिनं व्हिडीओच्या कॅप्शनमधून आळवला आहे. 

रिचाचा हा ‘आ गले लग जा’ फंडा तुम्हाला कसा वाटला ? Source link

Leave a Reply