Prarthana Behere चा हा बोल्ड लूक पाहिलात का? एक चर्चा


Prarthana Behere Bold Look : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्रार्थना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या प्रार्थना तिच्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. नुकतंच प्रार्थनानं एक फोटोशूट केलं. त्याचा व्हिडीओ तिनं शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

प्रार्थनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. प्रार्थनानं या व्हिडीओत पर्पल रंगाचा सूट परिधान केला आहे. यावेळी तिचा हा बोल्ड लूक काही नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. प्रार्थनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्रार्थनानं रेड हार्ट आणि इनफिनीटीचे इमोटीकॉन वापरले आहेत. 

प्रार्थनाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘खूप सुंदर दिसते.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘बॉस लेडी.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘आम्ही या फोटोशूटच्या फोटोंची प्रतिक्षा करत आहोत.’ दरम्यान, काही नेटकऱ्यांनी प्रार्थनला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘म्हातारी दिसत आहेस.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘छान दिसत आहात, मात्र, ते कपडे थोडे जास्त लहान आहेत.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘खरं सांगू नाही आवडलं मला, माफ करा…’

हेही वाचा : Samantha Ruth Prabhu: ‘शांकुतलम’ चित्रपटातील ‘मल्लिका-मल्लिका’ गाणं रिलीज, समांथाच्या लूकची होतेय चर्चा

प्रार्थना सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazi Tuzi Reshimgath) या मालिकेत दिसत आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत प्रार्थनानं नेहाची भूमिका साकारली आहे. प्रार्थनाची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. दरम्यान, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रार्थना तिनं शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आली होती. यावेळी तिचा बोल्ड लूक पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते.

प्रार्थनानं तिच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेल्या ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) या मालिकेतून केली होती. त्यानंतर प्रार्थनानं मागे वळून पाहिलं नाही. प्रार्थनानं ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या मराठी चित्रपटात काम केलं. त्यानंतर प्रार्थना ही  कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा अनेक मराठी चित्रपटात काम दिसली होती. Source link

Leave a Reply