Headlines

9500 किलोमीटरचा सायकलवरून प्रवास करत सांगली जिल्ह्यात आलेली पर्यावरण संवर्धन यात्री प्रणाली चिकटे सोबत आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडची बैठक , पर्यावरण रक्षणाच्या विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

सांगली/विशेष प्रतिंनिधी – पुनवत ता.वणी जिल्हा यवतमाळ येथील प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकटे ही 21 वर्षांची तरुणी ही पर्यावरण संवर्धन यात्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आत्तापर्यंत बावीस जिल्हे फिरून 9500 किलोमीटरचा प्रवास करत सांगली जिल्ह्यात आलेली आहे. काल प्रणाली सोबत आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड या संघटनेची क्रांती स्मृतीवन बलवडी येथे संवाद बैठक झाली.या बैठकीत पर्यावरण धोक्यात आणणारे घटक आणि त्यावरील उपाय यासह पर्यावरण रक्षणाच्या विविध मुद्द्यावर चर्चा झाली.यावेळी बोलताना ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते भाई संपतराव पवार म्हणाले ही पर्यावरणाची हानी होण्यास अर्थनीती जबाबदार आहे.त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या बड्या भांडवलदाराकडूनच पर्यावरणाला मोठा धोका पोहचत आहे.याबाबत सरकारची अर्थनिती बदलली पाहिजे.ब्रिगेडचे राज्य निमंत्रक काँ.मारुती शिरतोडे म्हणाले की पर्यावरण आरक्षणाच्या चळवळीत सर्व थरातील लोकांना समाविष्ट करून घेण्यात यायला हवे. आणि प्रणाली चिकटे सारख्या या तरुणीला महाराष्ट्रातील ग्रेटा थुनबर्ग या विशेष पुरस्काराने सरकारकडून गौरविण्यात यावे अशी मागणी केली.

 यावेळी बोलताना शेटफळे ता. आटपाडी येथील युवा कार्यकर्ते ,ग्रा.पं सदस्य विजय देवकर म्हणाले की पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा घेऊन वयाच्या एकवीसाव्या वर्षी एखादी तरूणी घराबाहेर पडते ही प्रणालीची दिशादर्शक क्रुती आजकालच्या तरण तरुणीना खूपच प्रेरणादायी बाब आहे. दैनिक सकाळचे पत्रकार दीपक पवार यांनी पर्यावरण रक्षणाची चळवळ ही जनचळवळ होण्यासाठी नजीकच्या काळात अभ्यास शिबीरे संघटीत करण्याची गरज व्यक्त केली. ब्रिगेड चे राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे बोलताना म्हणाले ही प्रणाली सारखी एक तरुणी गेली आठ महीने घराबाहेर पडून निसर्ग संवर्धनाचा संदेश हजारो लोकांच्या पर्यंत पोहोचवत इथपर्यंत आली या तिच्या धाडसाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचा सलाम. तर महेश मदने यांनी पर्यावरण रक्षणाच्या चळवळी सोबतच सध्या कोरोणाच्या महामारीत तरुणांनी मानवी जीविताला प्रचंड महत्त्व देऊन रक्तदान करूनच लसीचा डोस घेण्यात यावा असे आवाहन केले. विशाल शिरतोडे यांनी पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत चित्रपट आणि नाटक सारख्या ग्लॅमरला सामावून घेतले तर चळवळ व्यापक होऊ शकते असे मत व्यक्त केले.

ब्रिगेडचे सल्लागार संतोष खेडकर यांनी सायकल वापराचे फायदे आणि त्याचा आपल्या निसर्ग आणि शरीराशी असणारा संबंध अन दैनंदिन जीवनाचे गति चक्र याबाबत प्रणाली करत असलेली मोहीम ही महाराष्ट्रातील सर्व श्रेष्ठ मोहीम असल्याचे कथन केले. पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते देवकुमार दुपटे म्हणाले की सध्याचे विविध नैसर्गिक स्त्रोत हे पर्यावरणामुळे धोक्यात येत चालले असतानासुद्धा स्वतःची मानसिकता खंबीर ठेवून प्रवास करणारी प्रणाली हीने आज येरळा नदीतील पाणी थेट आपल्या घशात घेऊन पिली.यावरून पर्यावरणाशी निसर्गाशी तिचे किती जवळचे नाते आहे हे आपल्या लक्षात येते.युवक आघाडी चे वैभव शिरतोडे यांनी पर्यावरण रक्षणाच्या बाबत भटकी शेती करणारे लोक पर्यावरणा किती हानी पोहोचवतात हे सांगून चंद्रपूर-गडचिरोली सारख्या भागात त्याचा फटका किती मोठा बसू शकतो याबाबत आपले मत व्यक्त केले व या निसर्ग संवर्धन चळवळीत स्थानिक जनसंघटनाना सहभागी करून घेण्याचे आवाहन केले.सर्वांना मार्गदर्शन करताना पर्यावरण संवर्धन यात्री प्रणाली चिकटे म्हणाल्या कि वाढत चाललेल्या अतिरीक्त भोगवादी संस्कृती ला आपण पहिल्यांदा दैनंदिन जीवनातून वर्ज्य केले पाहिजे. विविध नैसर्गिक स्त्रोतांचा अधाशीपणाने होणारा वापर थांबवणेसाठी प्रबोधनाबरोबरच राजकीय इच्छाशक्ती खूप महत्त्वाची आहे.

यावेळी झालेल्या व्यापक चर्चेप्रसंगी ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते भाई संपतराव पवार ,आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे ,राज्याध्यक्ष दगडू जाधव ,उपाध्यक्ष सुनील दलवाई ,सरचिटणीस हिम्मतराव मलमे,सोशल मीडिया प्रमुख महेश मदने, राज्य संघटक लक्ष्‍मण शिंदे, बाळासाहेब खेडकर, संतोष खेडकर ,राज्य सल्लागार आदित्य माळी ,अभिजित घोरपडे,काँ.राजू यादव, युवक आघाडीचे वैभव शिरतोडे, विशाल शिरतोडे ,विक्रम शिरतोडे अविष्कार मदने,दैनिक सकाळचे प्रतिनिधी दीपक पवार ,पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते देवकुमार दुपटे,शेटफळे ग्रामपंचायत सदस्य विजय देवकर ,संभाजी निकम ,पलूस येथील सामाजिक कार्यकर्ते शैलेश पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *