९ ऑगस्ट रोजी तुळजापूरला भेटू! संभाजी छत्रपतींचे सूचक ट्वीट, मोठी घोषणा करणार? | sambhajiraje chhatrapati urges supporters to gather at tuljapur on 9 augustशिवसेना पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा न दिल्यामुळे संभीजी छत्रपती यांनी माघार घेत स्वराज्य या नव्या संघटनेची स्थापना केली होती. संघटनेच्या घोषणेपासून संभाजी छत्रपती यांची भूमिका काय असणार याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते. दरम्यान, छत्रपतींनी आज (३ ऑगस्ट) एक सूचक ट्वीट करत समर्थकांना येत्या ९ ऑगस्ट रोजी तुळजापुरात जमा होण्याचे आवाहन केले आहे. तसेच क्रांतीदिनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात होणार आहे, असे सूचक विधान संभाजी छत्रपती यांनी केले आहे.

हेही वाचा>> उदय सामंत हल्ला प्रकरण : “तुमचा थेट रोख उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर आहे का?” सामंत म्हणाले, “४० लोक आपल्यापासून दूर…”

माजी खासदार तथा स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजी छत्रपती यांनी सूचक ट्वीट केले आहे. “येत्या ९ ऑगस्ट रोजी म्हणजेच क्रांतीदिनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाची क्रांती सुरु होणार आहे. तुळजापूरला भेटुया. स्वराज्य.” असे सूचक ट्वीट संभाजी छत्रपती यांनी केले आहे.

हेही वाचा>> “विचार बदलला म्हणून काय ठार माराल? शांत आहे म्हणजे…”; गाडीवरील हल्ल्यानंतर उदय सामंतांचा सूचक इशारा

संभाजी छत्रपती येत्या ९ ऑगस्ट रोजी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. ही घोषणा नेमकी काय असेल? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्यांनी आपल्या ट्वीटममध्ये क्रांतीदिनी राज्याच्या परिवर्तनाची क्रांती होईल, असे सूचक विधान केले आहे. तसेच त्यांनी या दिवशी सर्व समर्थकांना तुळजापूर येथे येण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. त्यामुळे संभाजी छत्रपती या दिवशी नेमकी काय घोषणा करणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा>> “ही आमची क्रूर चेष्टा” पीएम मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदींचं महागाईविरोधात आंदोलन

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने पाठिंबा न दिल्यामुळे संभाजी छत्रपती यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर १२ मे रोजी स्वराज्य संघटनेची घोषणा केली होती. याच संघटनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी संभाजी छत्रपती यांनी महाराष्ट्र दौरा केला होता.Source link

Leave a Reply